आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

महादेवाचे केरवडे येथील डांगी कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले सांत्वन

मालवण (प्रतिनिधी) : महादेवाचे केरवडे येथील रुपेश अनंत डांगी वय -३० हे विजवितरणच्या कंत्राटदाराकडे वायरमन म्हणून काम करत असताना रविवारी त्यांना विजेचा धक्का बसून त्यांचे दुःखद निधन झाले. त्यामुळे डांगी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी माजी आमदार वैभव नाईक…

आंबेरी केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धा दिमाखात संपन्न

11 शाळामधील 100 मुलांचा सहभाग चौके (प्रतिनिधी) : “जिंकायचं म्हणून खेळण्यापेक्षा स्पर्धेत उतरण महत्वाचे आहे, जर स्पर्धकच नसतील तर जिंकल्याचा आनंद घेता येत नाही त्यामुळे स्पर्धेत सहभाग घेणे अतिशय गरजेचे आहे” असे प्रतिपादन गट साधन केंद्र मालवण येतील विषयतज्ज्ञ गौरी…

२१, २२ डिसेंबर रोजी चिवला बीच मालवण येथे राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन

आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने चिवला बीच मालवण येथे २१, २२ डिसेंबर रोजी आयोजित राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांना प्रवेश फी मध्ये सवलत मिळावी…

रत्नागिरी येथील गंधर्वरत्न प्रभूदेसाई स्मृती नाट्यगीत गायन स्पर्धेत

खारेपाटण हायस्कूलची विद्यार्थिनी कु.प्राजक्ता ठाकूरदेसाई हिने मिळविला द्वितीय क्रमांक खारेपाटण (प्रतिनिधी) : प.पू.गगनगिरी महाराज भक्त मंडळ रत्नागिरी आणि स्वरभिषेक संस्था रत्नागिरी यांच्यावतीने सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यातील स्पर्धकासाठी रत्नागिरी येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई स्मृती नाट्यगीत…

सेवानिवृत्त शिक्षक रमेश उबाळे यांचे निधन

न्यायाधीश अतुल उबाळे, नंदू उबाळे, राजू उबाळे यांना पितृशोक कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील रहिवाशी, सेवानिवृत्त शिक्षक रमेश नारायण उबाळे (८४) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. …

आंब्रड, कसाल, पावशी विभागात मा. आ. वैभव नाईक यांनी घेतल्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी

कुडाळ (प्रतिनिधी) : माजी आमदार वैभव नाईक यांनी रविवारी कुडाळ तालुक्यातील आंब्रड, कसाल, पावशी या जिल्हा परिषद विभागातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्यांनी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधला. शेवटचा नागरिक जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत काम करण्याची भूमिका यावेळी त्यांनी…

माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी च्या 2013-14 एसएससी बॅच विद्यार्थ्यांकडून प्रशालेला हार्मोनियम प्रदान

कणकवली (प्रतिनिधी) : असरोंडी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ,माध्यमिक विद्यामंदिर असरोंडीच्या सन 2013-14 दहावी बॅच कडून प्रशालेला हार्मोनियम प्रदान करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी ॲड.प्रसाद सावंत,दयानंद घाडीगावकर,प्रथमेश मुळ्ये व प्रशालेचे शिक्षक उपस्थित होते. बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष…

भूईबावडा घाटातील बंद असणारी रात्रीची एस टी वाहतूक तात्काळ सुरु करण्याची मागणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : एकीकडे करूळ घाट गेले वर्षभर बंद आहे.तर गेल्या दोन महिन्यापासून भुईबावडा घाटातील एस टी बस वाहतूक सायंकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठया गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी अवजड…

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत जय पेडणेकर व श्रेया सामंत विजेते.

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे  कला, वाणिज्य व  विज्ञान महाविद्यालयात आनंदीबाई रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटातून कणकवली महाविद्यालयाचा विद्यार्थी जय पेडणेकर तर मुलींच्या गटातून डॉन बॉस्को महाविद्यालय ओरोसची विद्यार्थिनी श्रेया…

आनंदीबाई रावराणे महाविद्यलयाचा हर्ष सावंत याला सुवर्णपदक

वैभववाडी (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयीन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान, महाविद्यालयाचा विद्यार्थी कु. हर्ष अभिजीत सावंत यांने  पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे. ०८ डिसेंबर…

error: Content is protected !!