धामापूर श्री देव मोरेश्वर गणपती मंदिर येथे भाविकांची अलोट गर्दी

सलग सातव्या वर्षी माघी श्रीगणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील धामापूर सडा येथील सुप्रसिद्ध श्री देव मोरेश्वर गणपती मंदिरात शनिवारी श्री देव मोरेश्वर मित्र मंडळाच्या वतीने माघी श्री गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सलग सातव्या वर्षी साजरा करण्यात आलेल्या या माघी गणेश जयंती उत्सवास परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवली आणि नवसाला पावणाऱ्या श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावर्षी गणपती मंदिराची आणि परिसराची फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई हे सुद्धा विशेष आकर्षण ठरत होते. सकाळी धार्मिक विधी आटोपल्यानंतर श्री देव मोरेश्वर गणपतीच्या दर्शनासाठी या ठिकाणी भाविकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. यामुळे या उत्सवाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झालं होते. आयोजकांच्या वतीने ठेवण्यात आलेल्या महाप्रसादाचाही अनेक भाविकांनी आस्वाद घेतला, तसेच रात्रौ झालेल्या पारंपारिक दशावतारी नाट्यप्रयोगाचाही अनेक नाट्य रसिकांनी आस्वाद घेतला आणि उत्सवाच्या शिस्तबद्ध व सुनियोजित आयोजनाचे कौतुकही केले. हा मागे श्री गणेश जयंती उत्सव सोहळा यशस्वी होण्यासाठी श्री देव मोरेश्वर मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. धामापूर सडा येथील श्री देव मोरेश्वर गणपतीच्या मागे श्री गणेश जयंती उत्सव सोहळ्यास दिवसेंदिवस वाढणारी भाविकांची गर्दी यामुळे या उत्सवाची आणि देवस्थानची महती सर्व दूर पसरत आहे.

error: Content is protected !!