भिरवंडे रामेश्वर मंदिरात आरोग्य शिबिराचे आयोजन


कणकवली (प्रतिनिधी) : भिरवंडे श्रीदेव रामेश्वर मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून देवालये संचालक मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरामध्ये गावातील रूग्णांची विविध रक्त तपासणी बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ यावेळ होणार आहे. यावेळी युरिक अॅसिड, मधुमेह रूग्णांची रक्त चाचणी, लिक्विड प्रोफाई तपासणी होणार आहे. तसेच रक्तदान शिबिर गुरूवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी १ यावेळ होणार आहे. रुग्ण तपासणी शिबिर सोमवारी १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळत डॉ. श्रीकांत सावंत ऑर्थोपेडिक तज्ञ मुंबई (भिरवंडे) हे गावातील रुग्णांची तपासणी करणार आहेत. जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा रूग्णाल, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवे कनेडी, उपकेंद्र भिरवंडे यांच्या सहकार्यातून हे आरोग्य शिबिर होणार आहे. या शिबिरात गावातील रूग्णांनी सहभागी होण्याचे आवाहन देवालये संचालक मंडळ भिरवंडे आणि ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!