खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ येथे सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेचा शुभारंभ संपन्न…

परीक्षेचे सलग ८ वे वर्ष, खारेपाटण परीक्षा केंद्राचे ३ रे वर्ष

एकूण १८ जि.प शाळा व १ हायस्कूल चा समावेश

इयत्ता २ री ४ थी ते ६ वी ते ७ वी च्या एकूण १२४ विद्यार्थ्यांचा सहभाग

खारेपाटण (प्रतिनिधी) : माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या सौजन्याने शालेय विद्यार्थ्यांकरीता घेण्यात येणाऱ्या सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षा अर्थात STS परीक्षा – २०२५ परीक्षेचा शुभारंभ आज रविवार दी.२ फेब्रुवारी २०२५ रोजी जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्राप्ती कट्टी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.

यावेळी खारेपाटण येथील डॉ.श्रीप्रसाद रानडे,सामाजिक कार्यकर्ते व शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे,माता पालक संघाच्या उपाध्यक्षा संध्या पोरे,खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक तथा एस टी एस परीक्षा केंद्राचे व्यवस्थापक प्रदीप श्रावणकर सर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शाळेच्या शिक्षिका श्रीमती अलका मोरे मॅडम यांनी सर्व उपस्थितीत मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेचे हे ८ वे वर्ष असून खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ येथे ही ३ री परीक्षा आहे.या परीक्षा केंद्रावर खारेपाटण हायस्कूल तसेच शेर्पे व खारेपाटण केंद्रातील जि.प. शाळेतील विद्यार्थी आणि पोंभूर्ले व कोर्ले येथील शाळांतील विद्यार्थी असे १९ शाळातील मिळून एकूण १२४ विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग नोंदविला.

” सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देणारी व विद्यार्थ्यांमधील बौद्धिक टॅलेंट ओळखून त्यांना पुढे येण्यास वाव देणारी ही स्पर्धा परीक्षा असून भविष्यातील उच्च अधिकारी सक्षम बुद्धिमान नागरिक घडवणारी ही स्पर्धा असल्याचे भावपूर्ण उदगार सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन करताना काढले.”

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केंद्र शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनी केले.तर सर्वांचे आभार शाळेच्या शिक्षिका श्रीमती आरती जोजेंन यांनी मानले.

error: Content is protected !!