हडी येथील ‘किसान गोष्टी’ कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद !

मसूरे (प्रतिनिधी) : कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (ATMA) अंतर्गत “किसान गोष्टी कार्यक्रम” हडी येथे आयोजित करण्यात आला. प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील कीटकशास्त्रज्ञ डॉ. वि. के. झोटे आणि डॉ. यशवंत गोवेकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी हडी सरपंच प्रकाश तोंडवळकर, ग्रामपंचायत सदस्य प्राची मयेकर, सायली मिठबावकर, दीक्षा गावकर, पोलिस पाटील श्रीधर गोलतकर, तृप्ती हडकर, जान्हवी पांजरी, पोलिस पाटील तोंडवळी जगदीश मुळे, राजा शेडगे आदिसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

डॉ. वि. के. झोटे यांनी नारळ पिकामध्ये आढळणाऱ्या प्रमुख रोग आणि किडी ओळखण्याच्या पद्धती आणि त्यांना नियंत्रित करण्यासाठी योग्य उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले. तसेच, रक्षक सापळा वापरन्याची पद्धत आणि त्याद्वारे फळमाशी नियंत्रित करण्याबाबत प्रात्यक्षिक दाखवले. डॉ. यशवंत गोवेकर यांनी बायोपेस्टीसाइड्स आणि जैविक पद्धतीने विविध कीड आणि रोग कसे नियंत्रित करावेत यावर मार्गदर्शन केले. तसेच, मेटारिजियम, ट्रायकोडर्मा, अझोटोबॅक्टर, आणि PSB या जैविक घटकांचा कोणत्या पिकावर कसा आणि किती प्रमाणात वापर करावा याबद्दल सखोल माहिती दिली.

रामगड कृषी पर्यवेक्षक राणी थोरात यांनी नारळ पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता ओळखण्यासाठी माती नमुना कसा गोळा करावा आणि माती गोळा करतांना कोणती दक्षता घ्यावी, तसेच कोणत्या ठिकाणची माती घेणे टाळावे याबद्दल मार्गदर्शन केले. आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक निलेश गोसावी यांनी आत्मा विषयी तांत्रिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला कृषी सहाय्यक आडवली आश्विन कुरकुटे, कृषिसेवक आचरा राधेश्याम डाखोरे, आणि कृषिसेवक चिंदर विवेकानंद खांडेकर यांनी सहकार्य केले. कृषिसेवक हडी विवेक रंगे यांनी सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन केले.

error: Content is protected !!