मोबाईल मिळाल्यानंतर लांजा  पोलीस स्थानकामध्ये जमा  केल्याने प्रामाणिक पणाबद्दल लांजा पोलीस स्थानकात शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार

लांजा (प्रतिनिधी) : रस्त्यामध्ये पडलेला मोबाईल मिळाल्यानंतर अनिल हरिश्चंद्र मोहिते रहाणार रत्नागिरी यांनी लांजा पोलीस स्थानकामध्ये जमा केल्याने त्याच्या प्रामाणिक पणाबद्दल लांजा पोलीस स्थानकाचे प्रमुख निळकंठ बगळे यांनी त्याचा शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

शनिवार दिनांक 1फेब्रुवारी रोजी अनिल हरिश्चंद्र मोहिते रहाणार उद्यम नगर रत्नागिरी हे पुनस ते देवेध रस्त्यावरून जात असताना विवो कंपनीचा मोबाईल रस्त्यावर पडलेला मिळाला. मोहिते यांनी तात्काळ लांजा पोलीस स्थानकात जमा केला.फोन कोणाचा आहे याबाबत चौकशी केल्यावर पुन गावातील नाईक यांच्या बागेतील गोरखा याचा असल्याचे समजले. सदर मोबाईल गोरखा यांना परत करण्याची तजवीज करण्यात आली असून मोहिते यांच्या प्रामाणिक पणाबद्दल लांजा पोलीस स्थानकाचे प्रमुख निळकंठ बगळे यांनी यथोचित सत्कार केला असुन.त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

error: Content is protected !!