आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मत्स्य उत्पादन वाढीच्या दृष्टीने तलावांच्या ‘डीजिटललायझेशन’ची प्रक्रिया तातडीने सुरू करावी – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील गोड्या पाण्याची मासळीचे उत्पादन वाढवणे आणि मच्छिमारांचा आर्थिकस्तर उंचावणे महत्वाचे आहे. त्यासाठी राज्यातील मासेमारी तलावांचे ‘डीजिटलायझेशन’ महत्वाचे आहे. ही प्रक्रिया तातडीने सुरू करावी असे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आज दिले. मंत्रालयात राज्यातील तालवांचे ठेके…

भाजप कुडाळ तालुका मेळाव्याचे १२ फेब्रुवारी रोजी आयोजन

विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांचा यावेळी होणार पक्षप्रवेश ओरोस (प्रतिनिधी) : भाजप कुडाळ तालुका मेळावा बुधवार १२ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता ओरोस भवानी मंदिर नजीकच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा भव्यदिव्य असणार असून विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांचा यावेळी पक्षप्रवेश होणार…

हवालदार सुनील वेंगुर्लेकर यांचा अप्पर पोलीस महासंचालकांच्या हस्ते सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत चांगले काम केल्याबद्दल महामार्ग पोलीस मदत केंद्राचे कर्मचारी हवालदार सुनील वेंगुर्लेकर यांचा अप्पर पोलीस महासंचालक सुरेश मेकला यांच्या हस्ते नवी मुंबई येथे सन्मान करण्यात आला. नुकतेच त्यांना शाल व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात…

मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावी – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्प आढावा बैठक मुंबई (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यात मिरकवाडा मत्स्यबंदर प्रकल्प रोजगारनिर्मिती वाढविण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर मासेमारीसाठी पायाभूत सोयी सुविधांचा विकास होवून मत्स्यउत्पादन वाढणार आहे. मिरकरवाडा रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासात ‘मैलाचा दगड’ ठरणारा आहे. या प्रकल्पाचे…

आंगणेवाडीच्या यात्रेसाठी येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी दोन विशेष गाड्या धावणार

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात आंगणेवाडीच्या यात्रेसाठी येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी मुंबईतील लो. टिळक टर्मिनसे ते सावंतवाडी दरम्यान दोन विशेष गाड्या रेल्वेकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. याबाबत कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार लो. टिळक टर्मिनस ते सावंतवाडी (०११२९) ही गाडी २९ फेब्रुवारी…

बेळणेत १३ पासून क्रिकेट स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : बेळणे येथील श्री पावणादेवी क्रिकेट मंडळातर्फे १३ ते १६ फेब्रुवारी रोजी दशक्रोशी प्रीमिअर लीग २०२५ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या संघाला २५,०२५ रु. व चषक, उपविजेत्याला १५,०२५ व चषक दिला जाणार आहे. याशिवाय मालिकावीर, उत्कृष्ट…

शिवसेनेची सदस्य नोंदणी गांभीर्याने घ्या सर्व निवडणुकांमध्ये भगवा फडकवायचा आहे – आमदार निलेश राणे

माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे सुरू करण्यात आली सदस्य नोंदणी कुडाळ (प्रतिनिधी) : आपले पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्ष संघटना वाढीचे वेड आहे ते नेहमी पक्ष वाढीसाठी काम करतात…

कणकवली येथील रत्नप्रभा रासम यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : सकाळ माध्यम समुहाचे जाहीरात प्रतिनिधी भास्कर रासम यांच्या मातोश्री रत्नप्रभा रावजी रासम (वय ९०) यांचे आज व्रुद्धपकाळे सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या कणकवली येथे राहात्या घरी निधन झाले. आज संध्याकाळी मूळ गावी हरकुळखुर्द येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात…

कबड्डी स्पर्धेत पुरुष गटातून पंचक्रोशी फोंडाघाट तर खो-खो स्पर्धेत शिडवणे महिला संघ विजेता

युवा संकल्प प्रतिष्ठान कणकवली आणि नेहरू युवा केंद्राच्यावतीने कासार्डेत तालुकास्तरीय विविध स्पर्धां संपन्न तळेरे (प्रतिनिधी) : युवा संकल्प प्रतिष्ठान कणकवली व नेहरू युवा केंद्र,सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने 15 ते 29 वयोगटातील कणकवली तालुका मर्यादित विविध क्रीडा स्पर्धा कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या…

सावंतवाडीचा रामदास राऊळ सिंधुदुर्ग श्री चा मानकरी!

मसुरे (प्रतिनिधी) : बेस्ट शिव-हनुमान मंदिर ट्रस्ट, सांताक्रुज मुंबई, बेस्ट शिव हनुमान व्यायाम शाळा, कांदळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय मानाच्या सिंधुदुर्ग स्त्री 2025 या शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह…

error: Content is protected !!