बेळणेत १३ पासून क्रिकेट स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : बेळणे येथील श्री पावणादेवी क्रिकेट मंडळातर्फे १३ ते १६ फेब्रुवारी रोजी दशक्रोशी प्रीमिअर लीग २०२५ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या संघाला २५,०२५ रु. व चषक, उपविजेत्याला १५,०२५ व चषक दिला जाणार आहे. याशिवाय मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक अशी वैयक्तिक स्वरुपातील बक्षिसेही देण्यात येणार आहेत. स्पर्धा लिलाव पद्धतीने होणार आहे.

error: Content is protected !!