हवालदार सुनील वेंगुर्लेकर यांचा अप्पर पोलीस महासंचालकांच्या हस्ते सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत चांगले काम केल्याबद्दल महामार्ग पोलीस मदत केंद्राचे कर्मचारी हवालदार सुनील वेंगुर्लेकर यांचा अप्पर पोलीस महासंचालक सुरेश मेकला यांच्या हस्ते नवी मुंबई येथे सन्मान करण्यात आला. नुकतेच त्यांना शाल व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, पोलीस उप अधीक्षक ज्योत्स्ना रासम, म.सु.प., रत्नागिरी विभाग, पोलीस निरीक्षक दिपाली जाधव यांचे उपस्थितीत तसेच महामार्ग पोलीस केंद्र कसाल, जिल्हा-सिंधुदुर्ग, हातखंबा, चिपळूण, कशेडी, जिल्हा रत्नागिरी, वाकण, महाड, बोरघाट, जिल्हा-रायगड, पळस्पे, नवीमुंबई या पोलीस मदत केंद्रांकडील प्रभारी पोलीस अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.

महामार्गावर कर्तव्य करताना, वाहतूकीचे नियमन, अपघातग्रस्तांसाठी वेंळोवेळी केलेली मदत, जनजागृतीपर प्रबोधन कार्यक्रम शाला, महाविद्यालय आणि महामार्गावर उत्तम दर्जाचे केलेले असून, सन २०२४ सालात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनधारकांवर त्यांनी सर्वाधिक १४६४ ई-चलन केसेसची कारवाई केलेली आहे तसेच ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह मधील ०६ वाहनधारकांवर कारवाई केल्या, त्यात सर्वांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कणकवली व सावंतवाडी न्यायालयातून द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे. या कामी त्यांना महामार्ग पोलीस मदत केंद्र कसाल, कणकवली कडील प्रभारी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हारूगडे यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे

error: Content is protected !!