कबड्डी स्पर्धेत पुरुष गटातून पंचक्रोशी फोंडाघाट तर खो-खो स्पर्धेत शिडवणे महिला संघ विजेता

युवा संकल्प प्रतिष्ठान कणकवली आणि नेहरू युवा केंद्राच्यावतीने कासार्डेत तालुकास्तरीय विविध स्पर्धां संपन्न

तळेरे (प्रतिनिधी) : युवा संकल्प प्रतिष्ठान कणकवली व नेहरू युवा केंद्र,सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने 15 ते 29 वयोगटातील कणकवली तालुका मर्यादित विविध क्रीडा स्पर्धा कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर संपन्न झाल्या.या स्पर्धेत कबड्डी पुरुष गटातून प्रथम क्रमांक – पंचक्रोशी फोंडाघाट तर द्वितीय क्रमांक खारेपाटण संघाने पटकवला आहे.

या स्पर्धेत अष्टपैलू खेळाडू म्हणून – सागर राणे,उत्कुष्ट चढाई -योगेश कुलकर्णी व उत्कृष्ट पकड – शुभम नार्वेकर यांना देऊन गौरविण्यात आले.
महिला गटात संपन्न झालेल्या खो-खो स्पर्धेत प्रथम् क्रमांक – शिडवणे महीला संघाने तर द्वितीय क्रमांक – कासार्डे ज्यु कॉलेजच्या संघाने पटकवला आहे.यामध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून – सायली तुकाराम पाष्टे,उत्कृष्ट संरक्षक मयुरी प्रकाश शेटये,उत्कृष्ट आक्रमक खेळाडू म्हणून सायली विलास पाळेकर यांना देऊन गौरविण्यात आले.

चौकट
मैदानी स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
100 मिटर धावणे पुरुष गट-
प्रथम क्रमांक – आशुतोष माळी
द्वितीय क्रमांक – निशांत परब
तृतीय क्रमांक – कार्तिक आचरेकर
100 मिटर धावणे महिला गट-
प्रथम क्रमांक – नेहा संतोष कदम
द्वितीय क्रमांक – सानिया विलास पाळेकर
तृतिय क्रमांक – प्राजक्ता दीपक मेस्त्री
गोळा फेक पुरुष गट-
प्रथम क्रमांक – स्वराज शेलार
द्वितीय क्रमांक – अनिरुद्ध भुते
तृतीय क्रमांक – रोहन कांबळे
गोळा फेक महिला गट-
प्रथम क्रमांक – अनु महेश प्रभू
द्वितीय क्रमांक – नेहा संतोष कदम
त्तुतीय क्रमांक – क्षितिजा सखाराम काळे यांना देऊन गौरविण्यात आले.

वरील विजेत्या सर्व स्पर्धकांना रोख रक्कम, आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमाला व्यासपीठावर कुडाळचे माजी गटविकास अधिकारी विजय चव्हाण, कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, संत रोहिदास सेवाभावी संस्थेचे राज्याध्यक्ष संजय कदम,उपाध्यक्ष रवींद्र पावसकर व खजिनदार पंढरी जाधव, कासार्डे गावाच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सौ.निशा नकाशे,भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष सत्यविजय जाधव,ग्रा.प.सदस्या श्वेता चव्हाण,
कासार्डे गावचे पोलीस पाटील महेंद्र देवरुखकर,महेंद्र आर्ट्सचे मालक महेंद्र चव्हाण,तिवरे पोलीस पाटील योगेश् चव्हाण तसेच युवा संकल्प प्रतिष्ठान कणकवलीचे अध्यक्ष आनंद जाधव, सचिव संदीप चव्हाण,संस्थापक अध्यक्ष प्रकाश वाघेरकर,संघटक विठ्ठल चव्हाण,सल्लागार प्रभाकर चव्हाण, निलेश चव्हाण,रुपेश पाताडे,संतोष जाधव,अनिल चव्हाण, संजय चव्हाण, शंकर चव्हाण,दत्ताराम जाधव,राजन पंवार,सचिन चव्हाण,जगदीश चव्हाण, दशरथ जाधव , निलेश वाघेरकर प्रदीप चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.

तर स्पर्धेचे पंच म्हणून दिवाकर पवार स, पाताडे , एकनाथ वाघेरकर यांनी काम पाहिले,स्पर्धेसाठी कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा दत्तात्रय मारकड व कनेडी माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक आणि बयाजी बुराण यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!