आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मुंबई – गोवा राष्ट्रीय महार्गावर नडगिवे पुन्हा अपघात

इको कार पलटी होऊन ४ जण जखमी खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महार्गावरील खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे या गावी महार्गावर सुरू असलेली अपघाताची मालिका काही केल्या थांबायचे नाव घेत नसून आज पुन्हा एकदा शुक्रवार दि.१ मे…

राज्याच्या विकासात कोल्हापूरला प्रगतीपथावर नेऊया : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना महाराष्ट्र राज्य या प्रगतीचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरत आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या या कर्मभूमीत आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत…

बौद्ध गार्डन संवर्धन विकास संघ, कोल्हापूर यांच्या वतीने महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांची 2570 वी जयंती उत्साहात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बौद्ध गार्डन संवर्धन विकास संघ, कोल्हापूर यांच्या वतीने महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांची 2570 वी जयंती अत्यंत उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बौद्ध बांधव व माता भगिनी, समाजातील मान्यवर आणि नागरिक…

अभिनेत्री अक्षता कांबळी पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारने सन्मानित

सिंधुदुर्ग पालक मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : १ मे महाराष्ट्र दीन तसेच सिंधुदुर्ग जिल्हा स्थापना दीन या दिवशी हा पुरस्कार सिंधुदुर्ग नगरी पोलिस कवायत मैदान येथे प्रदान करण्यात आला.अभिनेत्री अक्षता कांबळी गेली काही वर्षे महिलाना…

दारिस्ते मुख्य रस्त्यावर झाड तोडून अडवणूक

धनगरवाडी, शिरसाटवाडीतील ग्रामस्थांची गैरसोय अन्यथा ग्रामपंचायत ला टाळे ठोकण्याचा उत्तम लोकेंचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील दारिस्ते गावातील मुख्य रस्त्यावर झाड तोडून टाकून गावातील शेकडो ग्रामस्थांचा वाहतुकीचा रस्ता विघ्नसंतोषी लोकांनी बंद केला आहे. तात्काळ रस्त्यावरील झाड बाजूला करून ग्रामस्थांची गैरसोय…

स्वगणना करीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा जनगणनेचा शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राष्ट्रीय जनगणनेला आजपासून महाराष्ट्रात सुरुवात झाली असून मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वगणना करीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनगणनेचा शुभारंभ केला. या जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. कणकवली येथील पालकमंत्री…

सेवानिवृत्त भूमी अभिलेख कर्मचारी विजय चव्हाण यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील रहिवासी व भूमी अभिलेख विभागातून सेवानिवृत्त झालेले विजय काशिराम चव्हाण (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मुंबई येथे उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कणकवली शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.…

इन्सुली येथे शुक्रवारी साक्षात्कार दिन सोहळा

बांदा (प्रतिनिधी) : इन्सुली डोबाशेळ येथील श्री संत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार मंदिर येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही वैशाख शुद्ध पौर्णिमेला शुक्रवार दि. 1 मे रोजी संत सोहिरोबानाथ साक्षात्कार दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ​यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहेत.​सकाळी ६.००…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा समारोप

जलसंस्‍कृती रुजवणे ही काळाची गरज – जिल्‍हाधिकारी तृप्‍ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज बनली असून, जलसंपत्तीचे संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक असले तरी पाण्याचा योग्य आणि नियोजनबद्ध…

फोंडाघाट- गणेश मित्र मंडळ, कोरगावकरवाडी मार्फत स्थानिक कलावंत व जि.प.सदस्यांचा सत्कार !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट, कोरगावकरवाडी येथे नुकताच झालेल्या “निलमाधव” या दशावतारी नाट्यप्रयोगाला रसिक प्रेक्षकांनी लक्षणीय प्रतिसाद दिला. या प्रयोगात नवनियुक्त जि.प.सदस्य राजन चिके यांचेसह फोंडा गावातील नाटकप्रेमी बंडू पटेल, रमेश नारकर तसेच नाट्यकलावंत व सहकारी– धाकु मेस्त्री, अनंत तळेकर, संजय…

error: Content is protected !!