इको कार पलटी होऊन ४ जण जखमी
खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महार्गावरील खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे या गावी महार्गावर सुरू असलेली अपघाताची मालिका काही केल्या थांबायचे नाव घेत नसून आज पुन्हा एकदा शुक्रवार दि.१ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनी एक चार चाकी वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात एकूण ४ प्रवासी व्यक्ती जखमी झाल्या असून गेल्या आठवडा भरातील या स्पॉट वरील हा सलग ४ था अपघात असून यामुळे प्रवासी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, मुंबई परळ येथून वाहन चालक दीपक मधुकर दुधवडकर हे आपल्या ताब्यातील चारचाकी इको कार वाहन क्र. MH 01- EN 4214 घेऊन आपला भाऊ चंद्रशेखर यांसह आपल्या कुटबातील माणसे घेऊन तळेरे खंडवाडी येथे आपल्या मूळगावी येत असताना वाटेत मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे येथील एका धोकादायक वाहळावरील वळणावर वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटून झालेल्या अपघातात कार पलटी होऊन १५० मीटर फरफटत गेली.यामुळे गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या एकूण ७ प्रवाशांपैकी एकूण ४ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. यावेळी अक्षता चंद्रशेखर दुधवडकर,पूजा दीपक दुधवडकर, शुभांगी रमेश पेडणेकर व चालक दीपक मधुकर पेडणेकर हे एकाच कुटबातील ४ जण जखमी झाले.हा अपघात शुक्रवारी १ मे रोजी सकाळी ९.२५ वाजता मुंबई – गोवा राष्ट्रीय महार्गावर नडगिवे येथे पुन्हा एकदा त्याच धोकदायक वळणाच्या इथे घडला.
या अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण दुरशेत्राचे पोलिस अधिकारी श्री मिलिंद देसाई,पोलीस कॉन्स्टेबल सुनील निकम यांनी घटनास्थळी ताबोडतोब भेट देऊन अपघातातील जखमी प्रवाशांना मदत करून जवळ असलेल्या खारेपाटण प्रा.आ.केंद्रात दाखल केले.यावेळी प्रा.आ.केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर तरटे यांनी जखमी रुग्णावर उपचार केले.सदर गाडीतील सर्व व्यक्ती या आपल्या मूळ गावी तळेरे खंडवाडी येथे एका घरघुती कार्यक्रमा निमित येत असताना हा अपघात नडगिवे येथे घडला.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नडगिवे या ठिकाणी एकूण तीन अवघड वळणे ही अपघाताची हॉट स्पॉट बनली असून.नवीन महामार्ग अस्तिवात आल्या पासून अनेक वाहनांचा या ठिकाणी अपघात झाला असून अनेकांचा यामध्ये नाहक मृत्यू झालेला आहे.त्यामुळे यावर कोणतीही उपाय योजना न करता महामार्ग प्राधिकरण नुसती बघ्याची भूमिका घेणार असेल तर यापुढे येथे होणाऱ्या सर्व अपघातांस संबधीत अधिकारी व महामार्ग प्राधिकरण जबाबदार असेल असा इशारा येथील त्रस्त ग्रामस्थानी दिला आहे.















