सेवानिवृत्त भूमी अभिलेख कर्मचारी विजय चव्हाण यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील रहिवासी व भूमी अभिलेख विभागातून सेवानिवृत्त झालेले विजय काशिराम चव्हाण (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मुंबई येथे उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कणकवली शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विजय चव्हाण हे सामाजिक, धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नेहमी उत्साहाने सहभागी होत असत. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांची परिसरात विशेष ओळख निर्माण झाली होती.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई, सुना तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या मूळ गावी कळसुली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या निधनाने कणकवली परिसरातील एक मनमिळावू व हसतमुख व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!