अभिनेत्री अक्षता कांबळी पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारने सन्मानित

सिंधुदुर्ग पालक मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : १ मे महाराष्ट्र दीन तसेच सिंधुदुर्ग जिल्हा स्थापना दीन या दिवशी हा पुरस्कार सिंधुदुर्ग नगरी पोलिस कवायत मैदान येथे प्रदान करण्यात आला.अभिनेत्री अक्षता कांबळी गेली काही वर्षे महिलाना व्यासपीठ उपलब्ध करून देत महिलांचा आत्मविश्वास वाढवत समाजकार्य करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य शासन विभाग सिंधुदुर्ग यांच्या वतीने शासनाचा २०२०-२१ चा पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यासाठी सर्व स्तरातून कांबळी यांच्यावर अभिनंदन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. असे पुरस्कार मिळाले की आपली समाजासाठी काम करण्याची जबाबदारी वाढत आहे. असे कांबळी यांनी मालवणी भाषेत मनोगत व्यक्त करत सांगितले. तसेच जिल्हा महिला बाल विकास महाराष्ट्र राज्य शासन अधिकारी व कर्मचारी यांचे मनापासून आभार मानले.

error: Content is protected !!