बौद्ध गार्डन संवर्धन विकास संघ, कोल्हापूर यांच्या वतीने महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांची 2570 वी जयंती उत्साहात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बौद्ध गार्डन संवर्धन विकास संघ, कोल्हापूर यांच्या वतीने महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांची 2570 वी जयंती अत्यंत उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बौद्ध बांधव व माता भगिनी, समाजातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवातीला पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण डॉ. अरुण धुमाळे यांच्या हस्ते करून तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस जमलेल्या सर्व महिलांच्या वतीने पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन करून सामुदायिक बुद्ध वंदना आणि त्रिशरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रामुख्याने उपस्थित मान्यवर रंगराव पांडे, डॉ. अरुण धुमाळे तसेच प्रा. गंगावणे, ज्योती डोंगरे, आशा रावण, समाज कल्याण विभाग, तसेच लहू कांबळे सॉफ्टवेअर इंजिनिअर तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरेश आठवले या सर्वांनी बुद्धांच्या जीवनकार्यावर बुद्ध आणि धम्म तसेच भावी पिढीच्या शिक्षणा संदर्भात महत्वपूर्ण मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या व त्यांनी आजच्या दैनंदिन जीवनात बुद्धांच्या विचारांची गरज अधोरेखित केली.

या कार्यक्रमासाठी डॉ. मधाळे, अशोक चंदनशिवे, आनंद भोजने, सुरेश नागटिळे, स्वराज्य तालीम मंडळाचे मार्गदर्शक प्रवीण बनसोडे व अध्यक्ष उमेश भोसले गवंडी तसेच स्वराज्य तालीम मंडळाचे सर्व पदाधिकारी आपल्या सहकुटुंबासह या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. अशा पद्धतीने शेवटी उपस्थितांना स्वीट देऊन तोंड गोड करण्यात आले अशा आनंददायी वातावरणामध्ये तथागत गौतम बुद्ध यांची 2570 वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

error: Content is protected !!