फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट, कोरगावकरवाडी येथे नुकताच झालेल्या “निलमाधव” या दशावतारी नाट्यप्रयोगाला रसिक प्रेक्षकांनी लक्षणीय प्रतिसाद दिला. या प्रयोगात नवनियुक्त जि.प.सदस्य राजन चिके यांचेसह फोंडा गावातील नाटकप्रेमी बंडू पटेल, रमेश नारकर तसेच नाट्यकलावंत व सहकारी– धाकु मेस्त्री, अनंत तळेकर, संजय पांचाळ, अजित लाड, अरविंद लाड, अभिमन्यू लाड, दिनकर लाड, प्रकाश लाड, गिरीश लिंग्रस, रघुनाथ सावंत, निलेश लाड, सदा नावळे यांचा मान्यवरांचे हस्ते श्रीफळ ,शाल, पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन आनंद चिके मित्रमंडळातर्फे करण्यात आले. सूत्रसंचालन संतोष जोईल यांनी केले. नाट्य सोहळ्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला…
फोंडाघाट- गणेश मित्र मंडळ, कोरगावकरवाडी मार्फत स्थानिक कलावंत व जि.प.सदस्यांचा सत्कार !











