इन्सुली येथे शुक्रवारी साक्षात्कार दिन सोहळा

बांदा (प्रतिनिधी) : इन्सुली डोबाशेळ येथील श्री संत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार मंदिर येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही वैशाख शुद्ध पौर्णिमेला शुक्रवार दि. 1 मे रोजी संत सोहिरोबानाथ साक्षात्कार दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ​यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहेत.

सकाळी ६.०० वाजता काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होईल.​सकाळी ८.३० वाजता श्रींच्या पादुकांवर अभिषेक केला जाईल.​सकाळी ९.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा आरंभ होईल. ​दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद ,
​सायंकाळी ५.०० वाजता सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम.
​सायंकाळी ७.०० ते ८.३० वा. पालखी सोहळा होईल.
​रात्री ९.३० वाजता आजगांवकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचा तिरुपती बालाजी हा नाट्यप्रयोग सादर केला जाईल.या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष विश्राम पालव, सचिव गुरुनाथ पेडणेकर व सर्व सदस्य श्री संत सोहिरोबानाथ सेवा समिती इन्सुली,उत्कर्ष युवक कला क्रीडा व व्यायाम मंडळ,इन्सुली व भक्तमंडळीच्यावतीने
​करण्यात आले आहे.

error: Content is protected !!