Category बातम्या

आ.नितेश राणेंच्या प्रयत्नातून कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यात विकासगंगा

केंद्रियमंत्री राणे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तब्बल 61 कोटींचा निधी मंजूर कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ मध्ये, जिल्हा वार्षिक योजना नाबार्ड अर्थसहाय्य ,स्टेट फंड आणि आशियाई विकास बँक या योजनेमधून कणकवली, देवगड व…

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपकऱ्यांचे धरणे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जुनी पेन्शन लागू करा. या प्रमुख मागणीसाठी १४ मार्चपासून संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा या मागणीसाठी १४ मार्चपासून…

3 लाखांच्या मताधिक्यासह राऊत तिसऱ्यांदा खासदार होतील

खा. विनायक राऊत यांच्यावर वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील दहशदवाद संपविण्याची जबाबदारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्याकडे दिली. त्यांनी ती लीलया पेलली. २०१४ मध्ये दीड लाख मतांनी विनायक राऊत निवडून आले. २०१९ मध्ये त्यापेक्षा जास्त मतांनी…

बई एसीबी चे डीवायएसपी संतोष बर्गे यांची सुदान देशात पोलीस सल्लागार पदी निवड

देवगड (प्रतिनिधी) : मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्रामधील पोलीस उपअधिक्षक सुदान देशात संतोष धनसिंग बर्गे यांची संयुक्त राष्ट्र संघामध्ये पोलीस सल्लागार पदी म्हणून भारत सरकारतर्फे एक वर्षा करीता सुदान देशामध्ये नेमणूक करण्यात आली असून सुदान देशामध्ये त्यांनी अनेक गुन्हयामधील…

कविवर्य नारायण सुर्वेंच्या कवितेतील ओळी वगळल्या

नाट्य सेन्सॉर बोर्डाचा साहित्यिकांनी केला निषेध कणकवली (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध दिवंगत कवी नारायण सुर्वे यांच्या” जाहिरनामा” या संग्रहातील ” शीगवाला ” या गाजलेल्या कवितेतील काही ओळी या जातीवाचक आहेत असा आरोप मराठी नाट्य सेन्सॉर बोर्डने केला आहे.त्यामुळे त्या नाटकातून वगळण्यात…

जामसंडे येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या

देवगड (प्रतिनिधी) : जामसंडे येथील श्रीपाद राजेंद्र मोरे (20) या युवकाने दारुच्या नशेत घरातील बेडरुम मधील सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. सदरची घटना मंगळवारी रात्री 8 वा. सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार श्रीपाद राजेंद्र…

श्रीधर हरमलकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : जुने जानते मुंबईतील मिल कामगार तसेच कलमठ गावडेवाडी येथील रहिवासी श्रीधर पांडूरंग हरमलकर ( वय 73) यांचे साेमवारी रात्री दिर्घआजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दाेन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या वतीने रक्तवाढीसंदर्भात तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन

सामान्य रुग्णांना दरवाढ परवडणारी नसल्याने दर जुन्या धोरणाप्रमाणेच ठेवण्याची मागणी वैभववाडी (प्रतिनिधी) : रक्तदर वाढीसंदर्भात आज सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या वतीने तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ही दरवाढ सामान्य रुग्णांना परवडणारी नसल्याने रक्त दर जुन्या धोरणाप्रमाणेच…

सख्ख्या भावानेच केला मोबाईल व्यावसायिक सचिन चा अमानुष खून

अवघ्या 4 तासांत एपीआय अनिल व्हटकर यांनी खुन्याच्या आवळल्या मुसक्या अतिरिक्त तथा प्रभारी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचे मौलिक मार्गदर्शन सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : कसाल बाजारपेठेतील मोबाईल व्यावसायिक सचिन भोसले याच्या खुनाचा छडा सिंधुदुर्ग पोलिसांनी लावला असून तपासी…

म्हापसा येथील शिमगोत्सवात जीवन आनंद संस्थेच्या चित्ररथाचा सहभाग

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय संस्कृती आणि परंपरेत शिमग्याच्या सण उत्सवाला खूप मोठे स्थान आहे. देशातल्या विविध प्रांतातील लोक फाल्गुन महिन्यात शिमग्याचा सण आनंद आणि उत्साहाने साजरा करतात आणि सृष्टीतील नवचैतन्याने बहरलेल्या वसंत ऋतूच्या आगमनाचा आनंद मनमुराद घेत असतात.

error: Content is protected !!