Category बातम्या

कणकवली गणपती साना-जाणवली महामार्ग जोडणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवले

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर बांधकाम विभागाची कार्यवाही विद्यार्थी, पालक स्थानिक ग्रामस्थांकडून मानले आभार कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील गणपती साना ते जाणवली महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे पडलेले मोठमोठे खड्डे अखेर बुजविण्यात आले आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत सार्वजनिक…

लोरे नं. २ येथे कृषी सम्राट गटाकडून अझोला उत्पादन तंत्रज्ञान प्रात्यक्षिक

फोंडाघाट (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या रावे कार्यक्रमांतर्गत कृषी सम्राट गटामार्फत लोरे नं. २, वैभववाडी येथे अझोला उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना पशुधनासाठी पूरक हिरवा चारा म्हणून उपयुक्त असलेल्या…

ओसरगाव तंटामुक्ती अध्यक्षपदी रवींद्र पुंडलिक देसाई यांची बिनविराेध निवड

सरपंच सुप्रिया कदम यांनी केले अभिनंदन ओसरगाव (प्रतिनिधी) : ओसरगाव गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी रवींद्र पुंडलिक देसाई यांची बिनविराेध निवड करण्यात आली. गावातील सलोखा, शांतता आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने तंटामुक्ती समितीची भूमिका महत्त्वाची असून, देसाई यांच्या निवडीमुळे गावातील…

दातृत्वातून गुणवत्तेला प्रोत्साहन; प्रभुतेंडोलकर बक्षिस योजनेतून गुणवंतांचा गौरव

साळगाव (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देत त्यांच्या यशाला पाठबळ देण्याच्या उद्देशाने शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगाव येथे कै. अच्युत रघुनाथ प्रभुतेंडोलकर यांच्या स्मरणार्थ सुरू असलेल्या बक्षिस योजनेचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या योजनेअंतर्गत इयत्ता…

वायंगणी पुलावर ओव्हरलोड डंपरचा थरारक अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली!

पुलाचा कठडा तुटला, डंपरची मागील दोन्ही चाके निखळली; ओव्हरलोड व भरधाव डंपरवर कठोर कारवाईची मागणी वायंगणी उपसरपंच ॲड. समृद्धी आसोलकर आक्रमक; आचरा पोलिस ठाण्यात FIR दाखल, जनआंदोलनाचा इशारा आचरा (प्रतिनिधी) : वायंगणी नाका येथे वाळूने भरलेल्या ओव्हरलोड डंपरचा भीषण अपघात…

सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्या. फोंडाघाट

गणरायाच्या आगमनाच्या शुभमुहूर्तावर ‘लंबोदर ठेव योजना‘ मुदत : २५ महिने १०.३०% आकर्षक व्याजदर सर्व महिलांना १०.४५% व्याजदर जेष्ठ नागरिकांना १०.४५% व्याजदर आजच आपल्या ठेवीचे नियोजन करा ! प्रधान कार्यालय फोंडाघाट, उगवाई कॉम्प्लेक्स, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग. अधिक माहितीसाठी संपर्क (०२३६७)…

खारेपाटण येथील प. पू भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

संस्थेच्या आर्थिक उन्नतीत सभासदांचा मोलाचा वाटा – नसीरभाई काझी खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण सारख्या एका ग्रामीण भागातील सहकारी संस्था अल्पावधी कालावधीत आपले कार्यक्षेत्र जिल्हाभर पसरवून सहकार खऱ्या अर्थाने शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे अमूल्य असे कार्य करत असून संस्थेच्या आजपर्यंतच्या वाढत्या आर्थिक…

कणकवली, सावंतवाडी मधील बंद सिटीस्कॅन सुविधा तात्काळ सुरू करा

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय कणकवली व सावंतवाडी येथील मोफत सिटीस्कॅन सुविधा बंद करण्यात आली आहे. संबंधित कंपनीला शासनाकडून देयक न मिळाल्याने बंद झालेली ही सिटीस्कॅन सुविधा लवकरात…

शेर्पे गाव म.गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी भूषण शेलार यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शेर्पे या गावच्या ग्रामपंचातीची ग्रामसभा नुकतीच ३१ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली. या सभेमध्ये शेर्पे गावच्या म.गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी भाजप युवा कार्यकर्ते भूषण शेलार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडी…

२८२ पदांची जाहिरात, प्रत्यक्षात १६९ जण हजर

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांची कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलद्वारे पात्र ठरलेल्या १८८ उमेदवारांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पसंती दिली आहे. यापैकी कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या उमेदवारांपैकी १६९ जण उपस्थित राहिले. तर १९ जण अनुपस्थित…

error: Content is protected !!