शेर्पे गाव म.गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी भूषण शेलार यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शेर्पे या गावच्या ग्रामपंचातीची ग्रामसभा नुकतीच ३१ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली. या सभेमध्ये शेर्पे गावच्या म.गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी भाजप युवा कार्यकर्ते भूषण शेलार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

शेर्पे गावच्या सरपंच विशाखा पांचाळ यांनी गावचे नवनिर्वाचित तंटामुक्त समिती अध्यक्ष भूषण शेलार यांचे ग्रामपंचायतीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपसरपंच सिराज मुजावर, शेर्पे सोसायटीचे चेअरमन परशुराम बेलणेकर, ग्रामविकास अधिकारी पाटील
माजी सरपंच निशा गुरव, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, माजी उपसरपंच विलास पांचाळ, पोलिस पाटील विनोद शेलार, तसेच शेर्पे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!