Category बातम्या

कुंतीपुत्र कर्ण च्या जीवनाची संघर्ष गाथा “महारथी कर्ण” नाट्यास उत्स्फूर्त प्रतिसाद !

कृष्णजन्मोत्सव सोहळ्यात फोंडाघाट पंचक्रोशी दशावतारी कलाकार यांच्या अभिनय – कौशल्याचे कौतुक ! फोंडाघाट (कुमार नाडकर्णी) : सध्या बाजारपेठेतील राधाकृष्ण मंदिरात,कृष्ण जन्मोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, फोंडाघाट पंचक्रोशीतील दशावतारी कलाकार आणि सहकलाकार यांनी एकत्र येत, महान ऐतिहासिक नाट्य प्रयोग “महारथी कर्ण” सादर केला.…

गणेशोत्सवात नागरिकांची गैरसोय होऊ देऊ नका; सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे – तहसीलदार सूर्यकांत पाटील.

वैभववाडी (प्रतिनिधी) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे. उत्सवाच्या काळात नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी प्रत्येक विभागाने घ्यावी, अशा सक्त सूचना तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी दिल्या. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत…

पाटबंधारे विभागाची कामे निकृष्ट ; सुधारणा करा, अन्यथा पालकमंत्र्यांकडे तक्रार! – सभापती सिद्धेश रावराणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : मध्यम पाटबंधारे विभागाकडून करण्यात येणारी कालव्याची कामे निकृष्ट, दर्जाहीन होत असल्याचा गंभीर आरोप पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी केला. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने त्यांनी पंचायत समितीच्या सभेत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर…

तोंडवळी-तळाशिल पर्यटन संस्थेच्या अध्यक्षपदी संजय केळुसकर यांची निवड

नूतन कार्यकारिणी जाहीर; पर्यटन विकासाला चालना देण्याचा निर्धार आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील तोंडवळी-तळाशिल परिसरातील पर्यटनाला अधिक व्यापक स्वरूप देत स्थानिक पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी तोंडवळी-तळाशिल पर्यटन संस्थेची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी संजय केळुसकर यांची,…

जिल्ह्यात शनिवारी १३४ ठिकाणी दहीहंडीचा थरार

खासगी ११, सार्वजनिक ११७ तर राजकीय ६ दहीहंडींचा समावेश सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रम आज शुक्रवारी मोठ्या आनंदात पार पडला असून शनिवारी जिल्ह्यात १३४ ठिकाणी दहीहंडीचा थरार पाहायला मिळणार आहे. यामध्ये खाजगी ११, सार्वजनिक ११७ तर राजकीय…

गणेशोत्सवासाठी आरोग्य विभाग सज्ज; जिल्ह्यात १८ ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : गणेशोत्सव १४ सप्टेंबर पासून सुरू होत असून गणेशोत्सवासाठी दाखल होणाऱ्या चाकरमान्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात साथरोगाचा फैलाव होवू नये यासाठी १० ते १३ सप्टेंबर तसेच १६ व १७ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन, बस स्थानके व चेक पोस्ट…

जिल्हा परिषदस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा; आठ शिक्षकांची निवड

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. आठही तालुक्यांतून आलेल्या एकूण १९ प्रस्तावांमधून आठ शिक्षकांची निवड करण्यात आली. शिक्षक दिनाचे औचित्य साधून या पुरस्कारांची घोषणा करण्यात aale असल्याची माहिती जिल्हा…

अवनी भांगले हिने चार गोल्ड मेडलसह पटकावला मास्टर शूटर किताब

सावंतवाडी (प्रतिनिधी) : गोवा येथे आयोजित राज्यस्तरीय शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सावंतवाडीची कन्या कु. अवनी भांगले हिने चार सुवर्णपदके पटकावली आहेत. एकाच स्पर्धेत चार सुवर्णपदकांवर नाव कोरून तिने ऐतिहासिक कामगिरी केली असून स्पर्धेतील सर्वोच्च ‘मास्टर शूटर’चा बहुमानही संपादन केला आहे. तिच्या…

बांदा निमजगा अंगणवाडीत चिमुकल्यांची गोकुळाष्टमी उत्साहात

दहीहंडी फोडून बालगोपाळांचा आनंद; श्रीकृष्णाच्या वेशभूषेने वेधले लक्ष बांदा (प्रतिनिधी) : बांदा-निमजगा येथील अंगणवाडीत चिमुकल्या बालगोपाळांनी गोकुळाष्टमीचा उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला. यानिमित्त अंगणवाडी परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी श्रीकृष्णाच्या बालरूपाची अनुभूती उपस्थितांना…

सामाजिक कार्यकर्ते रफीक नाईक यांच्या वतीने देवदर्शन सहलीचे आयोजन

नडगिवे येथील महिलांनी घेतला गणपतीपुळे येथे देवदर्शनाचा आनंद खारेपाटण (प्रतिनिधी) : येथील सामाजिक कार्यकर्ते रफीक नाईक यांनी सामाजिक बाधिलकी जपत कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावच्या महिलांना एक दिवसीय देवदर्शन सहलीचे नुकतेच आयोजन केले होते.यामध्ये गावातील सुमारे ५० महिलांनी या देवदर्शन…

error: Content is protected !!