सामाजिक कार्यकर्ते रफीक नाईक यांच्या वतीने देवदर्शन सहलीचे आयोजन

नडगिवे येथील महिलांनी घेतला गणपतीपुळे येथे देवदर्शनाचा आनंद

खारेपाटण (प्रतिनिधी) : येथील सामाजिक कार्यकर्ते रफीक नाईक यांनी सामाजिक बाधिलकी जपत कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावच्या महिलांना एक दिवसीय देवदर्शन सहलीचे नुकतेच आयोजन केले होते.यामध्ये गावातील सुमारे ५० महिलांनी या देवदर्शन सहलीमध्ये
सहभाग घेत श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे भेट देत देवदर्शनाचा लाभ घेतला.

सामाजिक कार्यकर्ते श्री रफीक नाईक हे खारेपाटण पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक, महिला,शालेय विद्यार्थी यासाठी विविध उपक्रम राबवत असतात तसेच गरीब व गरजू लोकांसाठी आर्थिक मदत देखील करत असतात.त्यांच्या या सामाजिक दातृत्वाबद्दल खारेपाटण पंचक्रोशीत त्याचे विशेष कौतुक केले जात असून एक मुस्लिम युवक असताना देखील सामाजिक समतेचे कार्य करत हिंदू धर्मातील महिला भगिनींना देव दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नडगिवे गावच्या महिलांनी व ग्रामस्थानी त्याचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.

या देवदर्शन सहलीत श्रीमहालक्ष्मी देवी आडिवरे तसेच स्वामी स्वरूपनरायण मंदिर पावस व गणपतीपुळे या धर्मिक स्थळांचा समावेश होता.नडगिवे येथील सर्व सामान्य महिलांनी आपला कामातील व्यस्त वेळ बाजूला ठेऊन या देशदर्शन सहलीचा भक्ती भावने आनंद लुटला.व सामाजिक कार्यकर्ते रफीक नाईक यांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून जाहीर आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!