नूतन कार्यकारिणी जाहीर; पर्यटन विकासाला चालना देण्याचा निर्धार
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील तोंडवळी-तळाशिल परिसरातील पर्यटनाला अधिक व्यापक स्वरूप देत स्थानिक पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी तोंडवळी-तळाशिल पर्यटन संस्थेची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी संजय केळुसकर यांची, तर उपाध्यक्षपदी वासुदेव पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीत सचिवपदी विजय पाटील, खजिनदारपदी सागर मालंडकर यांची निवड करण्यात आली आहे. सदस्य म्हणून हनुमंत देऊळकर, संजय तारी, हर्षद पाटील, श्रीमती मनिषा पाटील, पुंडलीक टिकम, निपुण तांडेल आणि विकास पाटील यांचा समावेश आहे.तर सल्लागार म्हणून तुकाराम (आबा )कांदळकर यांची निवड करण्यात आली.
तोंडवळी-तळाशिल परिसराला अथांग लाभलेला निसर्ग सुंदर स्वछ समुद्रकिनारा आणि पर्यटनाच्या विविध संधी लक्षात घेता स्थानिक पर्यटनाला अधिक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे, पर्यटकांना दर्जेदार सुविधा मिळवून देणे तसेच स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी संस्था कार्यरत राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.












