Category बातम्या

क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; सुरेंद्र सकपाळ यांना ‘राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार’ जाहीर…!

आचरा (प्रतिनिधी) : सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आविष्कार फाउंडेशन, इंडिया (कोल्हापूर) यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार–२०२६’ साठी सिंधुदुर्ग जिल्हा लगोरी असोसिएशनचे अध्यक्ष तथा क्रीडा मार्गदर्शक सुरेंद्र सिताराम सकपाळ यांची निवड…

महाविद्यालय जिल्हा रुग्णालयाच्या उपहारगृहामध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने केलेल्या तपासणीत अस्वच्छ

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालयाच्या उपहारगृहामध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने केलेल्या तपासणीत अस्वच्छता तसेच अनेक त्रुटी आढळल्याने परवाना निलंबित करण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयाचा उपहारगृहामधिल पदार्थांमध्ये मेलेले झुरळ सापडल्याची घटना दोन दिवसापूर्वी…

राखीच्या धाग्यातून जुळले आपुलकीचे ऋणानुबंध!

रक्षाबंधनाच्या निमित्ताने सावंतवाडीतील माझ्या तमाम भगिनींनी दिलेल्या प्रेमाने मन भरून आलं तुमचा भाऊ म्हणून सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणी सदैव तुमच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करेन रक्षाबंधनानिमित्त युवा नेते विशाल परब यांच्याकडून लाडक्या भगिनींना स्नेहमय शुभेच्छा; माजगाव नाका येथे भावनिक कौटुंबिक सोहळा; विशाल…

वीज समस्यांवरून चिंदर ग्रामस्थ आक्रमक; महावितरणचे अधिकारी थेट ग्रामपंचायतीत

वीजवाहिन्यांवरील झाडी, बंद स्ट्रीटलाईट, गंजलेले पोल व वारंवार खंडित वीजपुरवठ्याची केली पाहणी; तात्काळ कार्यवाहीचे कार्यकारी अभियंता धनंजय शेंडे यांचे आश्वासन आचरा (प्रतिनिधी) : वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, वीजवाहिन्यांवर वाढलेल्या झाडा-झुडपांमुळे बंद पडलेले स्ट्रीटलाईट, गंजलेले विद्युत पोल तसेच इतर विविध समस्यांमुळे…

राजस्थान भरतपुर नगरपरिषद निवडणूक प्रचारात आमदार प्रमोद जठार सक्रिय

पक्षनिरीक्षक म्हणून स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून केले मार्गदर्शन कणकवली (प्रतिनिधी) : राजस्थानच्या भरतपूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार चंद्रकांत बावनकुळे यांच्या समवेत भाजपा आमदार प्रमोद जठार हे पक्षनिरीक्षक म्हणून सहभागी झाले आहेत. भरतपूर येथे आमदार जठार यांनी नामदार…

मोटारसायकल चोरीतील संशयित गोव्यात जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; वेंगुर्ला पोलिसांच्या ताब्यात ओरोस (प्रतिनिधी) : वेंगुर्ला पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील फरार संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोव्यात सापळा रचून ताब्यात घेतले. धीरज दिलीप गुप्ता (वय २०, रा. गणेश नगर, कोलवले, गोवा)…

विजयदुर्ग एसटी आगाराला मिळणार तीन नव्या गाड्या; मुंबईसह चिपळूण, सावंतवाडी मार्गही सुरू होणार

विजयदुर्ग (प्रतिनिधी) : विजयदुर्ग एसटी आगारातील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पंचायत समिती सदस्यांसह लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या शिष्टमंडळाने कणकवली येथील विभागीय वाहतूक अधिकारी (डी.टी.ओ.) विक्रम देशमुख यांची भेट घेतली. यावेळी आगारातील बससेवा, नव्या गाड्यांची उपलब्धता तसेच बंद असलेले विविध मार्ग पूर्ववत…

मालवण व कुडाळ तालुक्यात नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना मा.आम. वैभव नाईक यांची उपस्थिती

मालवण (प्रतिनिधी) : मालवण व कुडाळ तालुक्यात आज नारळी पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना माजी आमदार,शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी उपस्थिती दर्शविली. प्रथमतः वैभव नाईक यांनी समुद्राला नारळ अर्पण करत मच्छिमारांचे रक्षण करण्याची व…

नाटळ येथील सुधाकर सावंत (आप्पा) यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : नाटळ (राजवाडी) येथील रहिवासी आणि सेवानिवृत्त ग्रामसेवक सुधाकर महादेव सावंत (आप्पा) (वय ८४) यांचे बुधवारी रात्री राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. आपल्या प्रदीर्घ शासकीय सेवेत त्यांनी एक अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि जनतेच्या अडीअडचणीला धावून जाणारे ‘आदर्श…

श्री देवी चौंडेश्वरी चौक नामकरणाची मागणी मान्य

नगरसेवक जयेश धुमाळे यांच्या पाठपुराव्याला यश कणकवली (प्रतिनिधी) : श्री देवी चौंडेश्वरी मंदिर हे कणकवली परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असून मंदिरालगतच्या चौकाला देवीचे नाव देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक जयेश धुमाळे यांनी कणकवली नगरपंचायतीकडे केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करत…

error: Content is protected !!