प्रतिक पवार यांच्या ” पुस्तकांना का घाबरतात माणसं..? या काव्यसंग्रहाला ‘अक्षरसागर साहित्य मंच’चा पुरस्कार जाहीर…

वैभववाडी (प्रतिनिधी) : कवी.प्रतिक स्मिता उत्तम पवार लिखित हेतकर्स पब्लिकेशन प्रकाशित “पुस्तकांना का घाबरतात माणसं…?” या बहुचर्चित काव्यसंग्रहाला अक्षरसागर साहित्य मंच, गारगोटी यांचा राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर झाला असून साहित्यक्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सदर पुरस्काराचे वितरण दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुका श्री शाहू वाचनालय,गारगोटी येथे होणार असल्याची माहिती अक्षरसागर साहित्य मंचचे अध्यक्ष डॉ. मा. ग.गुरव यांनी दिली.

error: Content is protected !!