Category बातम्या

वैभववाडी बसस्थानकातील समस्या बाबतचे डी. के. सुतार यांचे उपोषण स्थगित

सभापती सिद्धेश दिलीप रावराणे यांची यशस्वी शिष्टाई वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी बसस्थानकातील विविध प्रलंबित प्रश्न व समस्या मार्गी लावण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डी. के. सुतार यांनी पुकारलेले उपोषण पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर स्थगित करण्यात आले.रस्त्यालगतची झाडे-झुडपे…

करूळ घाटात ट्रक बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटात जांभा चिऱ्याची वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने रविवारी सकाळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. माहिती मिळताच वैभववाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.तरेळेहून…

‘प्रोजेक्ट संजीवनी’चा कुडाळात शुभारंभ; ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच आरोग्य व रक्त तपासणीची सुविधा

कुडाळ (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच आरोग्य व रक्त तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मानव साधन विकास संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ या अॅम्ब्युलन्स सेवेचा शुभारंभ कुडाळ येथे उत्साहात पार पडला. ‘एक थेंब… एक आशा’…

नवीन कुर्ली येथे एसटी महामंडळाचे सवलत कार्ड काढण्यासाठी विशेष कॅम्प

नवदुर्गा युवा मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक फोंडाघाट (प्रतिनिधी) :आज नवीन कुर्ली येथे प्राथमिक शाळेमध्ये महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी महामंडळाचे सवलत कार्ड काढण्याचा विशेष कॅम्प नवदुर्गा युवा मंडळाकडून आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमामध्ये नवीन कुर्लीतील सुमारे १२५ महिलांनी…

कलमठ गावडेवाडी येथे शात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची पुढची पिढी सक्षम आणि स्वावलंबी व्हावी, या उदात्त हेतूने कलमठ गावडेवाडी येथील शात्रकुलोत्पन्न मराठा (गावडा) समाजाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलमठ गावडेवाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. समाजाच्या वतीने दरवर्षी इयत्ता…

स्वातंत्र्यदिनी बुधवळे शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केला थरारक मर्दानी खेळ..!

आचरा (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जि. प. शाळा बुधवळे नं. १ येथील विद्यार्थ्यांनी पारंपरिक मर्दानी खेळाचे दमदार व रोमांचक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या अंगी शौर्य, आत्मविश्वास, शिस्त आणि देशभक्तीची भावना रुजावी, या उद्देशाने शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हजारें…

‘मला अपेक्षित गाव’ निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिनी सत्कार

देवगड (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त २३ जून रोजी पंचायत समिती सदस्य रविंद्र तिलॉटकर यांच्या वतीने हुर्शी शाळेत ‘मला अपेक्षित गाव’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेच्या मोठ्या गटात…

विद्यार्थांनी अभ्यासासोबत जबाबदार नागरिक बनावे! सुधीर कदम

हडी येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे ७० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव गेली १९ वर्षे अविरत उपक्रम सुरु असल्याची सल्लागार चंद्रकांत पाटकर यांची माहिती आचरा (प्रतिनिधी) : मिळालेले यश तुमच्या कठोर परिश्रमांचे फलित आहे. शिक्षण आणि शिस्त हीच तुमच्या उज्ज्वल भविष्याची खरी…

विद्यामंदिर हरकूळखुर्द येथे ८० वा स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : विद्यामंदिर हरकूळखुर्दजि. सिंधुदुर्ग या प्रशालेत भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहपूर्ण व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रशालेच्या परिसरात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमात शालेय समितीचे अध्यक्ष आशुतोष…

भुईबावडा घाटातील दरड हटवून वाहतूक सुरळीत

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भुईबावडा घाटात रविवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास मोठी दरड रस्त्यावर कोसळली. त्यामुळे घाटातील वाहतूक सुमारे साडेतीन तास पूर्णपणे ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने जेसीबीच्या सहाय्याने दरड…

error: Content is protected !!