सभापती सिद्धेश दिलीप रावराणे यांची यशस्वी शिष्टाई
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी बसस्थानकातील विविध प्रलंबित प्रश्न व समस्या मार्गी लावण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डी. के. सुतार यांनी पुकारलेले उपोषण पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर स्थगित करण्यात आले.रस्त्यालगतची झाडे-झुडपे तोडण्यात यावीत, वैभववाडी तालुक्यात एस.टी. डेपो मंजूर करण्यात यावा, तसेच एस.टी. बसस्थानक परिसरातील विविध समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी श्री.सुतार यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते.
दरम्यान, पंचायत समिती येथे सभापती सिद्धेश दिलीप रावराणे यांनी श्री.सुतार यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मागण्या व समस्यांची सविस्तर माहिती जाणून घेतली. संबंधित प्रश्नांबाबत प्रशासनाशी समन्वय साधून टप्प्याटप्प्याने समस्यांचे निवारण करण्यात येईल, अशी ग्वाही सभापती रावराणे यांनी दिली. त्यानंतर सुतार यांनी आपले उपोषण स्थगित केले.
यावेळी उपसभापती साची कोलते, गटविकास अधिकारी श्री.वाघ, पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे, मंगेश लोके, सुवर्णा संसारे तसेच पंचायत समितीचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.












