देवगड (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त २३ जून रोजी पंचायत समिती सदस्य रविंद्र तिलॉटकर यांच्या वतीने हुर्शी शाळेत ‘मला अपेक्षित गाव’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेच्या मोठ्या गटात अनुजा झांबरे हिने प्रथम, स्वानंदी गावकर हिने द्वितीय, तर स्वरा कांबळी हिने तृतीय क्रमांक पटकावला. छोट्या गटात अर्णव बाणे याने प्रथम, तर करिष्मा थोटम हिने द्वितीय क्रमांक मिळविला.१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा पंचायत समिती सदस्य रविंद्र तिलॉटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पुरळ-गिर्ये विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सचिव विश्वनाथ तिलॉटकर, संचालक सुरेश देवळेकर, विकास देवळेकर, राजू तिलॉटकर, संदेश मुळम, प्राची बाणे, स्वरूपा शिंदे, मोनिका मुळम, भास्कर मोंडे, बेटा धुमाळ यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, गावाच्या विकासाबाबतची कल्पकता आणि सकारात्मक विचार रुजविण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन आवश्यक असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.












