Category तळेरे

महाराष्ट्र राज्य ज्युदो असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची तळेरेतील दळवी महाविद्यालयास भेट

तळेरे ( प्रतिनिधी ) तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयास लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे वंशज तथा महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनचे सचिव शैलैश टिळक, इतर महाराष्ट्र राज्य ज्युदो असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. तळेरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर यांनी महाविद्यालय…

कोण म्हणतो रस्ता होणार नाय, करून घेतल्या शिवाय राहणार नाय

तळेरे ते गगनबावडा रस्त्यासाठी शिवसेनेची करूळ ते नाधवडे पर्यंत २१ किमी पदयात्रा खा.विनायक राऊत,आ. वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्यासह शिवसेना आणि महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते सहभागी तळेरे (प्रतिनिधी): तळेरे ते गगनबावडा रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली…

नादुरुस्त असलेल्या तळेरे-गगनबावडा रस्त्यासाठी ३० ऑक्टोबर रोजी गगनबावडा ते तळेरेपर्यंत २१ कि.मी. शिवसेना(उबाठा)च्या पदयात्रेला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा

जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांची माहिती तळेरे (प्रतिनिधी): तळेरे ते गगनबावडा या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडून रस्त्याची पूर्णतः दुरावस्था झाली आहे. सदर रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून २५० कोटी रुपये मंजूर झालेले होते. या कामाची ०१/१२/२०२२ रोजी निविदा…

कासार्डेचे हायस्कुल चे क्रीडा शिक्षक तथा पत्रकार दत्तात्रय मारकड यांना पितृशोक

तळेरे (प्रतिनिधी): कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक शिक्षक,भारती व क्रीडा शिक्षक महासंघाचे जिल्हा व राज्य पदाधिकारी तसेच पत्रकार दत्तात्रय मारकड यांचे वडील जगन्नाथ केशव मारकड ( वय -९१ ) यांचे कांरडेवाडी ता.सांगोला जि.सोलापुर येथे वृध्दापकाळाने शनिवारी दि.२१…

कासार्डे विद्यालयाचे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत सुयश

९ खेळाडुंची विभागीय स्पर्धेसाठी निवड तळेरे (प्रतिनिधी) : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग यांच्यावतीने ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेच्या १४ खेळाडूंनी घवघवीत…

तळेरे बसस्थानक परिसरात स्वछताच नाही, तर सुंदरता कोठून येणार?

‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानांतर्गत सर्वेक्षण व परीक्षणासाठी आलेल्या पथकास सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांचा खडा सवाल…..! तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे बसस्थानकात सध्या अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले आहे. मात्र याबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने दक्षतापूर्वक योग्य ती उपाययोजना केलेली नाही. अशा परिस्थितीत…

राष्ट्रीय खुल्या ज्यूदो स्पर्धेत श्रद्धा चोपडेने सुवर्ण तर आकांक्षा शिंदे व अपूर्वा पाटील कांस्यपदकाची मानकरी

विकास देसाई आणि समीक्षा शेलार पाचव्या आणि सातव्या स्थानावर तळेरे (प्रतिनिधी): 01 ते 04 ऑक्टोबर दरम्यान जयपूर येथे आयोजित खुल्या राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या श्रद्धा चोपडेने तब्बल 25 वर्षांच्या कालावधीनंतर राज्याला सुवर्णपदक मिळवून दिले. 52 किलोखालील गटात मिळवलेले है…

वामनराव महाडीक हायस्कूल जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सवामध्ये प्रथम

तळेरे (प्रतिनिधी): प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर आणि माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद,सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तळेरे विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला व विभाग स्तरावर आपली चुणूक दाखविण्याची संधी प्राप्त केली.…

डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे कासार्डे विद्यालय परिसरात स्वच्छता अभियान

श्री सदस्यांचा स्त्युत उपक्रम तळेरे (प्रतिनिधी): डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, अलिबाग, रेवदंडा यांच्यावतीने स्वच्छता हीच देशसेवा समजून महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविले. रविवारी पाऊसचा जोर मोठ्या प्रमाणात असतानाही भरपावसात भिजत…

कणकवली तालुकास्तरीय ज्यूदो स्पर्धेत कासार्डे विद्यालयची बाजी : प्रशालेचे तब्बल २५ प्रथम

तळेरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत कणकवली तालुकास्तरीय ज्यूदो स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून बहुतांश वजनी…

error: Content is protected !!