ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे महाराष्ट्ररत्न पुरस्काराने सन्मानित

तळेरे (प्रतिनिधी) : ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल महाराष्ट्ररत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असताना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीने व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने वंचित घटकातील डोंगरी व दुर्गम भागातील जंगलातील व नुकसान झालेल्या व दरड ग्रस्त अतिवृष्टी झालेल्या भागातील गोरगरीब वंचित घटकातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन सातत्याने प्रयत्न केला म्हणून सिनेअर्कप्रोडक्शन मुंबई चे वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल पुणे येथे राष्ट्रपती पदक विजेते पठाण उपायुक्त पुणे महानगरपालिका यांच्या शुभहस्ते व सिने अर्क प्रोडक्शनचे चेअरमन विनोद खैरे व ज्ञानेश्वर मोळक अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका यांच्या शुभहस्ते व ज्येष्ठ इतिहास संशोधक जयदेव जाधव यांचे शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले.

प्रवीण काकडे यांनी शैक्षणिक साहित्य वाटप करून ४४९३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले काहींना शैक्षणिक फी भरून सहकार्य केले समाज प्रबोधन व जनजागृती अभियान राबवून समाज जागृत करण्याचे काम आजी सूर्य असून सातत्याने प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम सुरू आहे नोकरी करत करत प्रत्येक सुट्टीच्या दिवशी सामाजिक उपक्रम राबवून एक महान आदर्श घालून दिला आहे म्हणूनच त्यांना मार्च रत्न पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले. प्रवीण काकडे यांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सातारा सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे या सारखी जिल्ह्यातील डोंगरदऱ्या खोऱ्यातील गोरगरीब समाज बांधव जंगलातील गोरगरीब वंचित घटकातील मुलांना अनमोल असे सहकार्य करून समाजावर एक चांगला आदर्श निर्माण करून दिला अशी प्रतिपादन राष्ट्रपती पदक विजेते युसुफ पठाण साहेब यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!