संतश्रेष्ठ श्री चोखामेळा माऊली समाधी दिन सोहळ्याचे उद्या असगणीत आयोजन

सिंधुदुर्ग जिल्हा हरिजन समाजसेवा संघातर्फे उपस्थित राहण्याचे आवाहन

तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा हरिजन समाज सेवा संघ आयोजित संतश्रेष्ठ श्री चोखामेळा माऊली समाधी दिन सोहळा आज दि.4 जून 2024 रोजी सकाळी स.9.30 वा. असगणी ता.मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाची रुपरेषा पुढील प्रमाणे- पहिल्या सत्रात दीप प्रज्वलन, पूजा पाठ दर्शन, स्वागत, प्रास्ताविक, मान्यवरांचे मनोगत,प्रमुख मान्यवरांचे मनोगत, अध्यक्षीय भाषण व त्यानंतर सहभोजन संपन्न होणार आहे.

तर दुसऱ्या सत्रात श्री संत श्रेष्ठ चोखामेळा माऊली यांच्या जीवनावर ह.भ.प. श्री मृणाल गावकर यांचे नारदीय कीर्तन आणि हरी भजनाचा बहारदार संगीतमय कार्यक्रम संपन्न होणार आहे.

सर्व कार्यक्रम असगणी येथील आनंद विश्राम तांबे यांच्या निवासस्थानी संपन्न होणार आहे. तरी जिल्ह्यातील समाज बांधवांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा हरिजन समाजसेवा संघाचे अध्यक्ष आनंद वि तांबे व सचिव संदीप मो. तांबे यांनी केले आहे.

error: Content is protected !!