ग्रीन गोल्ड बांबू प्रोजेक्ट ग्रुप ऑफ कंपनीवतीने १० हजार बांबूरोपण

तळेरे (प्रतिनिधी) : ग्रीन गोल्ड बांबू प्रोजेक्ट ग्रुप ऑफ कंपनीतर्फे रविवारी 9/6/ 2024 रोजी फेज वन या प्रोजेक्टचा भूमिपूजन व बांबू रोपण अतिशय उत्साहात वातावरणात संपन्न झाले. याप्रसंगी ग्रीन गोल्ड ग्रुप ऑफ कंपनीचे सर्व सदस्य व त्यांचे कुटुंबासहित उपस्थित होते.या सर्वांच्या उपस्थितीत बांबू रोपण करण्यात आले. याप्रसंगी ग्रीन गोल्ड ग्रुप ऑफ कंपनीचे सर्वेसर्वा रामचंद्र फोंडके, एकनाथ पवार,दामोदर पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रीन गोल्ड ग्रुप ऑफ कंपनीच्यावतीने सुमारे दहा हजार बांबू रोपण करण्यात आले यानंतर या कंपनीचा उद्देश फेज टू यामध्ये सुद्धा याच प्रकारे बांबू लागवड केली जाईल व वैभववाडी तालुक्यातील सर्व बेरोजगार व गोरगरीब तरुणांना रोजगार दिला जाईल असा विश्वास ग्रीन गोल्ड बांबू प्रोजेक्ट ग्रुप ऑफ कंपनीचे श्री रामचंद्र फोंडके व श्री पांढरे यांनी व्यक्त केला व त्याचबरोबर श्री फोडके व श्री दामोदर पांढरे यांनी गोरगरीब तरुणांना व बेरोजगार युवकांना या ग्रीन गोल्ड ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये सहभागी व्हावे व वैभववाडी तालुक्यातील सर्व शेतकरी सुद्धा या ग्रीन गोल्ड ग्रुप ऑफ कंपनीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.

error: Content is protected !!