कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी भाग्यश्री बिसुरे तर पर्यवेक्षकपदी शामसुंदर राणे

तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेच्य मुख्याध्यापकपदी एम एम.बी. एड असलेल्या मराठी विषयाच्या जेष्ठ शिक्षिका भाग्यश्री बापू बिसुरे यांची तर,पर्यवेक्षकपदी विद्यालयाचे गणित,विज्ञानचे शिक्षक शामसुंदर राणे यांची ज्येष्ठतेनुसार नेमणुक झाली आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.सी.कुचेकर व पर्यवेक्षक एस.डी भोसले परवा ३१ मे २०२४ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर ही दोन्ही पदे रिक्त झाली होती. शनिवारी १ जून २०२४ रोजी कासार्डे विकास मंडळ,मुंबई चे सरचिटणीस रोहिदास नकाशे यांनी संस्थेच्या वतीने नेमनुकीचे पत्र देऊन दोघांचेही अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी कासार्डे विकास मंडळ,मुंबईचे सहसचिव आनंद कासार्डेकर,स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे,माजी कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर,माजी प्राचार्य एम्.डी.खाड्ये,मावळते मुख्याध्यापक एन.सी. कुचेकर ,कोर्ले-धालवली हायस्कूलचे मुख्याध्यापक रत्नाकर सरवणकर आदी मान्यवरांसह,विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक पी.जे.काळे,विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,शिक्षिका ऋचा सरवणकर,रजनी‌ कासार्डेकर, ललीता मिठबावकर,अनिल जमदाडे, विनायक पाताडे,वरिष्ठ लिपीक सुनिता कांबळे,सविता जाधव, वैष्णवी डंबे, सत्यवान तावडे,निकेत पावसकर,शिक्षकेतर कर्मचारी लक्ष्मण आंबुरे, प्रशांत सावंत,दिपेंद्र सुतार,रोहन भोगले, घनंदाडे आदी उपस्थित होते. दरम्यान संस्थेचे पदाधिकारी, रोहिदास नकाशे, संजय पाताडे,प्रभाकर कुडतरकर, आनंद कासार्डेकर, एम.डी.खाड्ये यांनी नूतन मुख्याध्यापिका बी.बी.बिसुरे तसेच नुतन पर्यवेक्षक एस.व्ही. राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!