तोंडवली बोभाटेवाडीत स्वसंरक्षण व संस्कार वर्गाचे उद्घाटन
तळेरे (प्रतिनिधी) : मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी आणि बेभरवशाच्या युगात आत्मसंरक्षण करण्यासाठी ज्युदो -कराटे व तायक्वांडो सारखी एखादी तरी कला आत्मसात करणे गरजेची झाली असून निरोगी शरीरासाठी,स्वयं शिस्तीसाठी आणि आत्मविश्वास जागृत करण्यासाठी प्रत्येकाने मार्शल आर्टची कला आत्मसात करायलाच हवी असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो व कराटे असोसिएशनचे सचिव तथा कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांनी तोंडवली बोभाटेवाडी येथे केले.
ते तोंडवली ग्रामस्थांच्यावतीने बोभाटेवाडी हनुमान मंदिरमधील कराटे व संस्कार वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
तोंडवली बोभाटेवाडीतील या कराटे स्वसंरक्षण आणि संस्कार वर्गाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी एकनाथ धनवटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी तोंडवली गावचे पोलीस पाटील विजय मोरये,,यशवंत सदडेकर, प्रमुख अतिथी संजय पाताडे (कासार्डे),शशांक तळेकर
व निलेश तळेकर-( तळेरे), वैशाली सदडेकर,साक्षी नाडकर्णी, तन्वी मेस्त्री, मयुरी बोभाटे, तुकाराम मोरये, दिगंबर साळुके,अंबरनाथ सांळुके,विजय मोरये,बाळा बोभाटे,मधुकर बोभाटे, मयुरी बोभाटे, सानिका बोभाटे, ज्योती भाट,मानसी बोभाटे,
मंगला मोरये, सिद्धी सांळुके, तन्वी मेस्त्री, गीता सांळुके, सुंनदा सांळुके, श्वेता साळसकर,सरीता साळसकर,दिपाली शिरसाट, सुरेखा बोभाटे, आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
मानसिक,बौद्धिक, शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत- एकनाथ धनवटे
या प्रशिक्षण वर्गाचे प्रशिक्षक तथा उद्घाटक एकनाथ धनवटे म्हणाले की,म्हणाले की ,मार्शल आर्टच्या प्रशिक्षणातून मुला-मुलींना मानसिक,बौद्धिक,आणि शारीरिकदुष्ट्या सक्षम करण्याचं काम केले जाते.
तोंडवली हनुमान मंदीरात शुभारंभ झालेल्या स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाला तोंडवली व परिसरातील बहुसंख्य मुले मुली उपस्थित होती.हा प्रशिक्षणवर्ग प्रत्येक शनिवार आणि रविवारी सुरू राहणार असल्याची माहिती आयोजनकांनी प्रसंगी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुषमा सावंत यांनी करताना दोन्ही वर्गाचे विशेष महत्त्व स्पष्ट करुन जास्तीत जास्त मुला-मुलींना या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सुत्रसंचालन अंगणवाडी सेविका ज्योती भाट यांनी केले व शेवटी आभारही त्यांनीच मानून कार्यक्रमाची सांगता केली.