जागतिक योगदिनाच्या पुर्वसंध्येला विद्यार्थ्यांनी दिल्या मानवी अक्षर लेखनातून शुभेच्छा

वराडकर हायस्कूल कट्टाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

चौके (अमोल गोसावी) : उद्या २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी अक्षर लेखनाच्या माध्यमातून (WORLD YOGA DAY) ही अक्षरे साकारत आगळ्या वेगळ्या पध्दतीने शुभेच्छा दिल्या. यावेळी मैदानावर प्रशालेचे मुख्याध्यापक संजय नाईक.पर्यवेक्षिका देवयानी गावडे, क्रीडा शिक्षक संजय पेंडुरकर,रामकृष्ण सावंत,किसन हडलगेकर,महेश भाट, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते,समीर चांदरकर व भूषण गावडे यांच्या संकल्पनेतून ही अक्षर कलाकृती साकारली गेली.

error: Content is protected !!