नांदोस – चव्हाणवाडी येथे बांधण्यात आला श्रमदानातून जलसंवर्धन बंधारा

चौके (प्रतिनिधी) : शिवसेना युवासेना मालवण तालुका सरचिटणीस अमित चव्हाण यांच्या संकल्पनेतून व सर्व चव्हाणवाडी युवकांच्या सहकार्याने मालवण तालुक्यातील नांदोस चव्हाणवाडी येथे श्रमदानातून जलसंवर्धन बंधारा बांधण्यात आला. भविष्यात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर वेळीच उपाययोजना व्हावी या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या श्रमदान कार्यात सूर्यकांत चव्हाण , प्रदीप चव्हाण, यशवंत चव्हाण , कमलेश चव्हाण , सुभाष चव्हाण, युवा शाखाप्रमुख- रुपेश चव्हाण, नितीन चव्हाण , घनश्याम चव्हाण , विक्रम चव्हाण , जय चव्हाण , चिराग चव्हाण , यश चव्हाण , प्रणय चव्हाण , मयुर नांदोसकर ,ओम चव्हाण , रुद्र चव्हाण , विजय नांदोसकर, कुणाल नांदोसकर, बाळकृष्ण नांदोसकर यांनी श्रमदान करून मोलाचे सहकार्य केले. या प्रसंगी नांदोस ग्रामपंचायत सरपंच माधुरी चव्हाण यांनी सदर स्थळी येऊन भेट दिली तसेच शिवसेना युवा जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांनीही संपर्क साधून सर्वांचे कौतुक केले.

error: Content is protected !!