दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्याची सर्वांना ताकद दे — पालकमंत्री राणे यांचे राधाकृष्णाला साकडे !
फोंडाघाट भाजीपाला मित्र मंडळाच्या अघोरी नृत्य देखाव्याचा घेतला आनंद
फोंडाघाट (प्रतिनिधी) : श्री देव राधाकृष्ण मंदिर फोंडाघाट येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह ला पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवार ३ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा भेट दिली. यावेळी त्यांनी, सर्वांना येणाऱ्या दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्याची सर्वांना ताकद दे ! अशी प्रार्थना केली आणि सर्वांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत जि. प. सदस्य मनोज रावराणे, मिलिंद मेस्त्री, प. स.सदस्य पवन भालेकर, फोंडाघाटचे स्थानिक पुढारी व कार्यकर्ते, हेमंत फोंडेकर आणि अन्य उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांचे वैश्य समाज मंडळातर्फे, सदस्य दिलीप पारकर व गणपत पारकर यांनी श्रीफळ,पुष्प, शाल देऊन स्वागत व सत्कार केला. त्यानंतर त्यांनी मंदिरा बाहेर फोंडाघाट भाजीपाला मित्र मंडळ आयोजित अघोरी नृत्य देखाव्याचा आनंद घेतला.














