कर्तव्य बजावताना, सामाजिक भान आणि पालकमंत्री- पालकमित्रांच्या आवाहनाला प्राधान्य ! नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव !

भालेकरवाडी, शाळा नंबर १ येथे अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य अधिकारी,आणि सहाय्यकांच्याकडून वनराई बंधाऱ्यांची निर्मिती !

घामाच्या प्रत्येक थेंबातून जलसंवर्धनाचा संदेश

फोंडाघाट (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून, पालकमित्र शुभांगी साठे यांनी फोंडाघाट ग्रामपंचायत मध्ये भेट देऊन, जलसंवर्धनानतून येऊ घातलेल्या दुष्काळी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी, वनराई बंधारे कच्चे बंधारे, निर्मितीचे आवाहन केल्यानंतर फोंडाघाट मधील अंगणवाडी सेविका, आशासेविका तसेच आरोग्य अधिकारी – सेवकांनी मनावर घेतले. उगवाई नदीवर वाहते पाणी अडवून भालेकरवाडी येथे बंधारा तयार केला. आणि पाणी अडवण्यात आले.

कर्तव्य बजावत असताना, घामाच्या प्रत्येक थेंबातून जलसंवर्धनाचा संदेश त्यांनी समाजाला दिला. प्रत्येकाने स्वतःपासून पाण्याचा संतुलित वापर केल्यास आणि ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ आचरण्यात आणले तर, दुष्काळाच्या झळा कमी होतील.भालेकरवाडी येथील धडक मोहिमेत सुजाता भालेकर,स्वाती रासम, वनिता वारंग, कविता सावंत, सीमा रेवडेकर, वर्षा वायगंणकर, सुलभा लाड, प्रणाली पवार, विद्या म्हस्कर, मनस्वी सावंत, माया मेस्त्री, प्राची उरणकर,ललिता जाधव, सायली कदम,अश्विनी येरम, प्रियंका कामतेकर आणि मानसी सावंत या अंगणवाडी सेविकांनी श्रमदान केले . त्यांच्या कर्तव्यातत्पर कामाचे ग्रामस्थानी कौतुक केले.

नदीच्या पात्रातील वाळू, माती,दगड पिशव्यांमध्ये भरून बांध तयार करताना, प्लास्टिक कागदाचा वापर केला. आणि जास्तीत जास्त पाणी साठवण्यासाठी उंची मातीचे सांधप करून, घट्ट बंधारा निर्मितीचे काम मराठी शाळा नंबर एक येथे आशासेविका, आरोग्य सेवक ,आरोग्य अधिकारी केंद्रे,सेवक साळुंखे यांनी मोठ्या उत्साहाने पार पाडले. यावेळी वैदेही वंजारे, माधुरी येंडे, वैभवी सावंत, संजना सावंत, सेजल कदम, संचिता जाधव, सिद्धी तेली, मेघना लाड, प्रियांका शिंदे या आशासेविकांनी श्रमदानात प्रत्यक्ष सहभाग घेतला. योग्य पाणीसाठा झाल्यामुळे लगतच्या ग्रामस्थांनी या सर्वांचे कौतुक केले. बंधाऱ्यामुळे लगतच्या विहिरींचा स्रोत पुढे कायम राहणार असल्याने, समाधान व्यक्त होत आहे….

error: Content is protected !!