कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुरत्न ग्लोबल फाऊंडेशन कणकवली (रजी.)च्या अध्यक्षा अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी प्रति वर्षाप्रमाणे ह्या ही वर्षी पितृ पक्षात आपल्या सहकाऱ्यांसह असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित द्विविजा आश्रम* येथे जात अन्नदान व आर्थिक मदत केली .तसेच अक्षता कांबळी यांनी मालवणी गाजली व दशावतार अभिनय करत आश्रम मधील आजी आजोबांना मंत्र मुग्ध केलं.आजी आजोबा यांनी ही गायन करत वातावरण प्रसन्न केले.या आश्रम मध्ये पंचावन्न आजी आजोबा आहेत. पारंपारिक श्राद्ध कर्म घरी करून आपण एका दिवसाचे जेवण आश्रमात दान करावे असे आवाहन अभिनेत्री कांबळी यांनी केले .यावेळी फाऊंडेशन सदस्य मिलन पाटील , खजिनदार – रविकिरण शिरवलकर, अनिल कांबळी,श्रद्धा तावडे, माधवी कांबळी ,नंदिता ढेकणे, स्मिता पांगे,माधवी मिठबावकर, प्रज्ञा पाटकर,सागर पाटील,आकाश पांगे,मनोहर पाटील उपस्थित होते.यावेळी आश्रम संचालक संदेश शेट्ये , संचालिका साधना तेलतुंबडे ,सायली तांबे व सर्व कर्मचारी यांनी सर्वांचे आभार मानले.
असलदे येथील द्विविजा वृद्धाश्रमात सिंधुदुर्ग ग्लोबल फाउंडेशन (रजि.) च्या वतीने अन्नदान व आर्थिक मदत












