युवा संदेश प्रतिष्ठान, कनेडी सांगवे तर्फे मोफत वह्या वाटप व दहावी-बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

कणकवली (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान, कनेडी सांगवे तर्फे बुधवार २१ रोजी सकाळी १० वाजता ज्ञानदीप सांस्कृतिक भवन कनेडी येथे दहावी-बारावी परीक्षा मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तसेच जिजाऊ प्रतिष्ठान तर्फे व युवा संदेश प्रतिष्ठान कनेडी सांगवे यांच्या माध्यमातून प्रशालेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमास माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत,माजी जि. प.अध्यक्षा संजना संदेश सावंत, कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे पदाधिकारी, माध्यमिक विद्यामंदिर कनेडी शालेय समिती चेअरमन आर्. एच्. सावंत व सदस्य, माध्यमिक विद्यामंदिर कनेडी चे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण इ. मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी केले आहे.

error: Content is protected !!