आचरा रामेश्वर मंदिरात रंगणार समूह नृत्याचा जल्लोष…!

गणेशोत्सवा निमित्त १० ऑक्टोबरला भव्य खुली समूह नृत्य स्पर्धा; प्रथम क्रमांकासाठी २१ हजारांचे पारितोषिक

आचरा (प्रतिनिधी) : इनामदार श्री देव रामेश्वर आचरा येथे गणेशोत्सवा निमित्त यंदाही भव्य खुल्या समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे ३६ वे वर्ष असून शनिवार, १० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९ वाजता ही स्पर्धा उत्साहात पार पडणार आहे. विविध समूहांच्या आकर्षक नृत्याविष्कारामुळे आचरा रामेश्वर मंदिर परिसरात नृत्याचा जल्लोष रंगणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या समूहाला २१ हजार रुपये रोख व चषक, द्वितीय क्रमांकाला १५ हजार रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकाला १० हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ३ हजार रुपये व चषक अशी आहेत.

स्पर्धेला रात्री ठीक ९ वाजता सुरुवात होणार असून नृत्य सादरीकरणाचा क्रम त्याच वेळी स्पर्धास्थळी काढण्यात येईल. प्रत्येक समूहामध्ये किमान ६ आणि कमाल १० कलाकार असणे आवश्यक आहे. स्पर्धेचे नियम व अटी बदलण्याचे अधिकार मंडळ व आयोजकांकडे राहतील. परीक्षणासंदर्भातील काही शंका असल्यास स्पर्धेनंतर परीक्षकांशी चर्चा करून त्यांचे निरसन करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या भव्य स्पर्धेसाठी राजन पुजारे, बाबू हडकर, प्रकाश मेस्त्री, दीपक सुर्वे, विनोद गवळी, यल्लाप्पा गुरव, जयदीप पाटील, धुळाजी कर्पे, वसंत देसाई, सुशल देसाई, भाऊ हडकर, प्रसाद कावले, मनोहर शाहा आणि राजा शेवाळे यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.

स्पर्धेचे आयोजन विजय उर्फ बाबू कदम यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून अधिक माहितीसाठी विजय उर्फ बाबू कदम – ९४२१५७४७०० आणि तेजस्विता केळुसकर – ९४०४४५७८३५ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!