खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, खारेपाटण संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, प्लस 2 स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेतील चार विद्यार्थ्यांनी नवोदय प्रवेश परीक्षेत यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांची निवड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केंद्रीय नवोदय विद्यालय सांगेली, सावंतवाडी या ठिकाणी झाली आहे. इयत्ता पाचवीतील रुद्र राजू गर्जे, संस्कृती संगप्पा गुरव, रेवन अनंत राऊळ, रितेश गोरक्षनाथ गायकवाड या चार विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे आणि त्यांच्या या यशात मोलाचा वाटा असणाऱ्या त्यांच्या पालकांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, सहसचिव राजेंद्र वरूणकर, खजिनदार संदेश धुमाळे तसेच सर्व संचालक, प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक अजय गुरसाळे तसेच सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.