ग्रामरोजगार सेवक दिगंबर जाधव मालवण तालुक्यात प्रथम

आचरा (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक दिगंबर महादेव जाधव यांना पंचायत समिती मालवण तालुक्यातील अव्वल ग्रामरोजगार सेवक म्हणून निवडण्यात आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत दिगंबर जाधव यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये 4266 एवढया मनुष्यदिनाची निर्मिती करून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. गेली अनेक वर्षे जाधव हे अव्वल दर्जाचे काम करत असून या सन्माना बद्दल सर्वस्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!