खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील संभाजी नगर गुरववाडी येथील रूनाल ठूकरुल यांचा लहान मुलगा कु.पवित्रा याला कर्क रोगाच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सुमारे ५०,००० रुपये मंजूर झाले असून याबाबतचे लेखी पत्र नुकतेच प्राप्त झाले असल्याची माहिती शिवसेना कणकवली उपतालूका प्रमुख मंगेश गुरव यांनी दिली. या करीता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे तसेच रतंसिंधु योजनेचे संचालक किरण उर्फ भैया सामंत यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे. तर शिंदे गटाचे शिवसेना कणकवली उपतालूका प्रमुख मंगेश गुरव यांनी खारेपाटण संभाजी नगर गुरववाडी येथील कर्ग रोग बाधित लहान मुलगा कु.पवित्रा रूनाल ठूकरुल याला वैद्यकिय उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.













