माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेला विद्यार्थिनीकडून पंखा प्रदान

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्या मंदिर कनेडी,एम. एम. सावंत आर्ट्स अँड कॉमर्स ज्यु. कॉलेज कनेडी, टी. एस.सावंत सायन्स ज्यु. कॉलेज कनेडी, बालमंदिर कनेडी या प्रशालेतील विद्यार्थीनी कु. प्राची महाबळेश्वर देसाई इ.८ वी अ या विद्यार्थिनीचा सोमवार दिनांक १७ जुलै २०२३ रोजी वाढदिवस होता. या वाढदिवसा निमित्ताने तिने प्रशालेला २८००/ रु. किंमतीचा एक पंखा प्रशालेला भेट दिला. आपण ज्या प्रशालेमध्ये शिक्षण घेतो त्या प्रशालेचे आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेने तिने प्रशालेचे मुख्याध्यापक सुमंत दळवी यांच्या कडे पंखा सुपुर्द केला.

या तिच्या सामाजिक कार्याबद्दल कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत आणि सर्व सदस्य, शालेय समितीचे चेअरमन आर्.एच्.सावंत व सर्व सदस्य,मुख्याध्यापक सुमंत दळवी,पर्यवेक्षक बयाजी बुराण,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक व विद्यार्थी यांनी तिचे कौतुक केले व वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!