कणकवली (प्रतिनिधी) : आरटीआय तथा सामाजिक कार्यकर्ते सी आर चव्हाण यांची भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र या राज्यस्तरीय संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.तर जिल्हा सरचिटणीस पदी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संतोष जाधव, जिल्हा कार्याध्यक्षपदी बाबल नांदोसकर, जिल्हा उपाध्यक्षपदी देवरुखकर गुरुजी, सहदेव चव्हाण तसेच महिला जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मी रमाकांत बांबर्डेकर यांची निवड करण्यात आली.संघटनेचे राज्याध्यक्ष पंढरी चव्हाण यांनी नवोदित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. भारतीय चर्मकार समाज संघटना मुंबई ची राज्यस्तरीय, विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय बैठक ओरोस येथील रवळनाथ मंदिर सभागृहात राज्याध्यक्ष पंढरी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीत जिल्हास्तरीय नूतन पदाधिकारी निवड करण्यात आली. यावेळी राज्य सरचिटणीस अरुण होडावडेकर , राज्य उपाध्यक्ष प्राजक्त चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, सुरेश चौकेकर, ,कार्याध्यक्ष अनिल चव्हाण, सहसचिव प्रतीक्षा चव्हाण, संचालक मालिनी चव्हाण, गणेश चव्हाण ,कणकवली तालुकाध्यक्ष प्रभाकर जाधव, सिंधुदुर्ग युवा संघटन सचिव अनिसकुमार चव्हाण आदी उपस्थित होते.












