रोटरियन अनिल कर्पे यांचा वाढदिनी सामाजिक उपक्रम
कणकवली (प्रतिनिधी) : रोटरी क्लब कणकवली च्या वतीने तालुक्यातील हुंबरठ गोपाळनगर येथील रमेश होळकर याना मोफत व्हीलचेअर प्रदान करण्यात आली.रोटरीयन अनिल कर्पे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत व्हीलचेअर दिली. व्हीलचेअर मिळाल्यामुळे एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणे थोडे सोपे होणार असल्यामुळे दिव्यांग रमेश होळकर यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. हुंबरठ गोपाळनगर येथे होळकर यांच्या घरी जात रोटरी सदस्यांनी व्हीलचेअर प्रदान केली. रोटरीयन अनिल कर्पे यांच्या दातृत्वाबद्दल सर्वांनी आभार मानले.यावेळी रोटरी सेंट्रल क्लब कणकवलीचे प्रेसिडेंट रवी परब, सचिव प्रा.जगदीश राणे, रोटरीयन डॉ.विद्याधर तायशेटे, ऍड दीपक अंधारी, अंकिता कर्पे, मेघा गांगण, दादा कुडतरकर, लवू पिळणकर, रमेश मालवीय, राजेश कदम, प्रमोद लिमये, उषा परब, राजस परब आदी उपस्थित होते.