जिल्हा वीज कंत्राटी कर्मचारी संघटना आक्रमक
अशोक सावंत , रणजित देसाई यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांकडून अधिकारी कर्मचारी धारेवर
कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ गवळदेव येथे 21 जुलै रोजी विद्युत वाहिनी खांबावर काम करत असताना शॉक लागून गंभीर दुखापत झालेला कंत्राटी कर्मचारी धनंजय फाले याला न्याय मिळालाच पहिजे. या मागणीसाठी आज जिल्हा वीज कंत्राटी संघटना अध्यक्ष अशोक सावंत व भाजपा पदाधिकारी रणजित देसाई यांच्या नेतृत्वाखालीभाजप पदाधिकारी कार्यकर्ते व फाले याच्या घरातील नातेवाईकांनी वीज वितरण कार्यालयाला धडक देत अधिकारी कर्मचारी यांना जाब विचारला.
फाले हा कंत्राटी कामगार असताना त्याला विद्युत वाहिनी पोलावर चढण्याचा अधिकार आहे का ? कंत्राटी कर्मचाऱ्यांना पोलावर चढविताना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या सुविधा दिल्या जातात? फाले याचा अपघात हॅन्ड ग्लोज व किटच्या अनुपलब्धतेमुळे झाला आहे. आज या घटनेला संबंधित ठेकेदारसह वीज वितरण अधिकारी जबाबदार आहेत? असा सवाल करीत आज जिल्हा वीज कंत्राटी संघटना अध्यक्ष अशोक सावंत व भाजपा पदाधिकारी रणजित देसाई यांच्या नेतृत्वाखालीभाजप पदाधिकारी कार्यकर्ते व फाले याच्या घरातील नातेवाईकांनी वीज वितरण कार्यालयाला धडक देत अधीक्षक अभियंत्याच्या केबीनमध्ये ठान मांडत धडक दिली. कुडाळ- एमआयडीसी येथील महावितरण कार्यालयात आज जिल्हा वीज कंत्राटी संघटना व भाजप शिष्टमंडळाने धडक देत वीज वितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व फाले यांचे नातेवाईक यांनी पाटील, उपअभियंता व शाखा अभियंता छाया परब यांना धारेवर धरले.
यावेळी विनोद पाटील यांनी प्रशासनाची बाजू मांडत हा अपघात किटच्या अनुपलब्धतेमुळे झाला नाही. तरी देखील दुखापतग्रस्त वायरमन फाले याला नियमानुसार इलेक्ट्रिक इंजिनिअरचा रिपोर्ट आला की, शासकीय नियमानुसार माणुसकी स्वरुपात नक्कीच यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेण. या प्रकरणाची नक्कीच दखल घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यावेळी कार्यकर्ते शांत झाले होते. कुडाळ गळवदेव येथील महावितरणच्या पोलवर तीन दिवसापूर्वी कंत्राटी वायरमन धनंजय फाले पोलवर काम करीत होता. त्यावेळी त्याला विजेचा धक्का बसून तो त्याच ठिकाणी लटकत राहिला. त्यानंतर जागृत नागरिक, पोलिस आणि महावितरणच्या यंत्रणेने त्याला खाली उतरवत उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. सद्यस्थितीत त्याच्यावर गोवा- बांबुळी येथे उपचार सुरू असून त्याचा एक डोळा, कान व एक हात यांना गंभीर दुखापत झाली आहे.
यावेळी उपस्थित भाजप पदाधिकारी म्हणाले, फाले हा विदयुत पोलावर काम करीत असताना त्याच्या सोबत एकही कर्मचारी का? पाठविण्यात आला नाही. यावेळी एक लाईन बंद करण्यात आली होती. मग दुसरी लाईन कशी सुरु राहीली. तुम्ही अधिकाऱ्यांनी सुद्धा का पहिले नाही.? आज ज्याचा मुलगा गंभीर जखमी झालाय त्याची कळकळ त्याच्या वडीलांना आहे. तुमच्या कामासाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला आहे. तुमच्या परवानगी शिवाय तो पोलावर चढला होता. तुमच्या हलगर्जीपणा मुळे त्याच्या आज जीवावर बेतले आहे. आम्ही ज्यावेळी प्रश्न मांडतो त्यावेळी तुम्ही अधिकारी कधीच समाधानकारक उत्तर देत नाही. आज त्याच्या वडिलांना स्वतःचा मुलगा हॉस्पिटलमध्ये बघायला डॉक्टर घेत सुद्धा नाहीत. आज त्यांच्यावर ही वेळ तुमच्यामुळे आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात आठ महिन्यातील ही पाचवी घटना आहे. कोल्हापूर सारख्या शहरात अशी एकही घटना घडत नाही. कोल्हापूरमध्ये 1200 कामगार आहेत. आणि आपल्याकडे फक्त 550 कामगार आहेत तरी अशा घटना घडत आहेत. दुर्दैवी बाब आहे. आज तुम्ही फाले याला काय मदत करणार आहात ते सांगा असा सवाल यावेळी अशोक सावंत यांनी केला. आणि महावितरण कडून फाले यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली पाहीजे अशी मागणी केली.
यावेळी प्रितेश राऊळ, कुडाळ भाजप मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर,मोहन सावंत, प्रकाश मोर्ये,पंढरी परब,सागर रणसिंग, संदिप साटम, धोंडी चिंदरकर,सुनील बांदेकर,कानू शेळके, वडील बाबु फाले व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.