भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी घेतली वैभववाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची भेट

तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दिल्या सावंत यांना शुभेच्छा

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले प्रभाकर सावंत यांनी वैभववाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांच्या एडगांव इनामदारवाडी येथील निवासस्थानी वैभववाडी तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ , पुस्तके देऊन सन्मान केला. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी वैभववाडी तालुका भाजपा कार्यालय सहीत,जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, माजी उपसभापती अरविंद रावराणे, जिल्हा बँक संचालक तथा माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती दिलीप रावराणे, माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी नगरसेवक सज्जन काका रावराणे यांच्या निवासस्थानी तर भालचंद्र साठे यांच्या कार्यालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली वैभववाडी तालुक्याचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी सावंत यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत , जिल्हा कार्यालय संपर्कप्रमुख समर्थ राणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी पंचायत समिती उपसभापती अरविंद रावराणे, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, सज्जन काका रावराणे, वाभवे नगरपंचायत नगराध्यक्षा नेहा माईनकर, नावळे उपसरपंच संजय रावराणे, भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, युवा जिल्हा उपाध्यक्ष राजू पवार, महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे, युवा मोर्चा वैभववाडी तालुका अध्यक्ष किशोर दळवी,बांधकाम सभापती नगरपंचायत विवेक रावराणे,प्रदीप रावराणे,नगरसेवक रोहन रावराणे, शांतेश रावराणे, संताजी रावराणे, बाळाजी रावराणे, श्री उत्तम सुतार, रत्नाकर कदम,वैभववाडी तालुका कार्यालय संपर्कप्रमुख अनंत फोंडके, वैभववाडी तालुका मीडिया प्रमुख युवा आशिष रावराणे,नारायण मांजरेकर,सागर इंदप व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!