खरारे पेंडूर सरपंच पदी भाजपच्या नेहा परब विजयी

ठाकरे गटाच्या उमेदवार वैष्णवी लाड यांचा ९ विरुद्ध २ मतांनी पराभव

चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत खरारे पेंडूरच्या सरपंच पदी भारतीय जनता पक्षाच्या नेहा नंदकुमार परब विजयी झाल्या आहेत. नेहा परब यांनी ठाकरे गटाच्या वैष्णवी लाड यांचा नऊ विरुद्ध दोन मतांनी पराभव केला.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत व जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती संतोष साठविलकर यांनी नवनिर्वाचित सरपंच सौ नेहा परब यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी मावळत्या सरपंच सुनीता मोरजकर, आतीक शेख, दीपा सावंत, शेखर फोंडेकर, साबाजी सावंत, संजय नाईक, सतीश पाटील, श्रावणी नाईक, श्वेता फोंडेकर, उत्तम परब, अमित सावंत, उपसरपंच विवेक जबडे, सुमित सावंत, कृष्णा माडकुलकर, शैलेश परब, अश्विनी पेडणेकर, समृध्दी सरमळकर, अंकिता सावंत, रवी गावडे, संदीप सरमळकर, संदेश नाईक, शाम आवळेगावकर, सुरेंद्र जबडे,आबा वारंग व अन्य उपस्थित होते. मावळत्या सरपंच सुनीता मोरजकर मोरजकर यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. या पदासाठी निवडणूक अधिकारी श्रीकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक घेण्यात आली.

यावेळी भाजपाकडून नेहा परब व शिवसेना ठाकरे गट कडून वैष्णवी लाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीत भाजपच्या नेहा परब यांना नऊ मते मिळाली तर ठाकरे गटाच्या वैष्णवी लाड यांना दोन मते मिळाली. सौ. परब या विजयी होत सरपंच पदी विराजमान झाल्या.

error: Content is protected !!